Beed Crime : केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.  मस्साजोग येथील सरपंचाचे अपहरण करून खून अपहरण करुन हत्या करण्यात आलीये. संतोष देशमुख असं सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आला आहे. 


अधिकची माहिती अशी की, सरपंच आणि त्यांचा भाऊ धारूर हून केजच्या दिशेने जात असताना अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून सरपंचांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने केला आहे. सरपंचाचे भाऊ शिवराज देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय. देशमुख यांचा मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून मोठा जमाव या ठिकाणी जमला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र काही तासानंतर बोरगाव - दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते त्यांनी मस्साजोग ग्रामपंचायत ला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत.
या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमका हा घातपाताचा प्रकार कसा व का घडला याचा तपास केज पोलीस करत आहेत.


आमदार योगेश टीळेकर यांच्या मामाचे अपहरण खून 


भाजपचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांच्या मामा सतीश वाघ यांचं देखील अपहरण करुन खून करण्यात आलाय. मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं चौघांनी अपहरण केलं. मांजरा परिसरात ही घटना घडलीये. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुन्हे शाखा आणि पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. 


सतीश वाघ हे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत.. याशिवाय सतीश वाघ शेतकरी असून हडपसर परिसरातील मांजरी भागात त्यांचा व्यवसाय देखील आहे.. काही हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत.. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेतायत.. कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं असं अचानक अपहरण झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय घाबरले आहे.. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ यांचा अपहरण झाले.. अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला.. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हाही दाखल झालाय.. या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहे.. अपहरण झालेली व्यक्ती विद्यमान आमदाराचे मामा असल्याने पोलिसांनी खास पथक तयार केली आहे..

 

इतर महत्त्वाच्या बातम्या