Kurla BEST Bus Accident: एक भरधाव बस मुंबईतल्या (Mumbai News) गजबजलेल्या परिसरात घुसली आणि 50 हून अधिक जणांना चिरडून एका सोसायटीच्या गेटवर आदळून थांबली. या अपघातानंतर संपूर्ण मुंबई हादरली. या घटनेत तब्बल 7 जण दगावले. कुणी आपली आई गमावली, तर कुणी आपल्या पोटची पोरं, कुणाचे वडील हिरावले गेले, तर कुणी भाऊ गमावला. पण आता या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडीओमध्ये एक हेल्मेट घातलेला तरुण मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. सर्वांसमोर अगदी बिनधास्त हा तरुण मृत महिलेच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून घेत आहे. दरम्यान, व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
कुर्ला अपघातानंतरचा धक्कादायक आणि लाजीरवाणा प्रकार उघड झाला आहे. कुर्ल्यातील भरधाव बेस्टच्या अपघातात मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांच्या चोरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हेल्मेट घातलेल्या युवकानं सर्वांसमोर मृत महिलेच्या बांगड्या चोरल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 'हाथ मे गोल्ड है', असा स्पष्ट आवाज व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकाराचा तपास होणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Viral VIDEO मध्ये काय दिसतंय?
मुंबईतील कुर्ला परिसरात बस अपघातानंतर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अपघातान मृत्यू झालेल्या कणीस फातिमा अन्सारी यांच्या मुलानं माझ्या आईचे दागिने चोरीला गेल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर खळबळ माजली होती. अपघातातील मृतदेहांवरचे दागिनेही काही निर्दयी लोकांनी चोरल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण या चर्चांना कोणताच आधार नव्हता. अखेर आता महिलेच्या मृतदेहाच्या हातातल्या बांगड्या चोरत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कुणीतरी हेल्मेट घातलेला एक युवक मृतावस्थेत पडलेल्या महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढत आहे. 'हाथ मे गोल्ड है', असा स्पष्ट आवाज व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. हेल्मेट घातलेला युवक सर्वांसमोर हे कृत्य करतोय, पण त्याला तिथे असलेल्यांपैकी कुणीच थांबवण्याचं धाडस करत नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असं मुंबई पोलिसांचे म्हणणं आहे.
FIR दाखल करुन चौकशी करणार : मुंबई पोलीस
डीसीपी गणेश गावडे यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, हा व्हिडीओ आमच्या निदर्शनास आला आहे, आम्ही त्याची गांभीर्यानं दखल घेतली असून आज आम्ही याप्रकरणी एफआयआर नोंदवून हे कृत्य कोणी केलं याचा तपास करू.
दरम्यान, कुर्ल्यातल्या बेस्ट बसच्या अपघातात सात निष्पापांचा जीव गेला. या अपघातात कुणी आपली मुलं गमावली, तर कुणी आपली आई. त्या कुटुंबात अवघ्या एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळं कुटुंबीयांची व्यथा, त्यांचं दु:ख हे कुणाच्याही हृदयाला पाझर फोडेल असंच आहे. अनेकजण तर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत, त्यांचा दोष काय? त्यांच्या वाट्याला हे भोग कुणामुळे? कुर्ल्यातील बस अपघातात ज्यांनी जीव गमावला, त्यांच्या कहाण्या सुन्न करणाऱ्या आहेत. पण, त्यासोबतच माणुसकीला काळीमा फासणारा आणि अत्यंत संतापजनक असा मृतांचे दागिने चोरतानाचा हा व्हिडीओ आहे.
7 निष्पापांचा बळी, तर 49 जण जखमी
मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानं अवघा महाराष्ट्र हादरला. कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून एक भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा जीव गेला तर 49 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या 20-22 वाहनांचंही मोठं नुकसान झालं.
पाहा व्हिडीओ : Kurla Bus Accident Video : निर्लज्जपणाचा कळस, कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
महत्त्वाच्या इतर बातम्या :