Kunal Raut News Update : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे (Maharashtra Youth Congress) अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांची पोलीस कोठडीत (Police Custody) तब्येत बिघडली आहे. कुणाल राऊत यांची (Kunal Raut Health) तब्येत बिघडल्याने त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut Health Update) यांना मेयो रुगणालयात (Mayo Hospital Nagpur) म्हणजे इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (Indira Gandhi Government Medical College & Hospital) उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे. कुणाल राऊत यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.
कोठडीत कुणाल राऊत यांची तब्येत बिघडली
पोलीस कोठडीत पोटदुखीच्या तक्रारीनंतर कुणाल राऊत मेयोमध्ये सोमवारी रात्री उशिरा उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयाने सोमवारीच कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या फलकांचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयाने कुणाल राऊत यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे बुधवारपर्यंत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असताना त्यांनी तब्येत बिघडली आहे.
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Youth Congress) कुणाल राऊत (Kunal Raut) यांना नागपूर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. कुणाल राऊत हे राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे सुपुत्र आहेत. कुणाल राऊत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान मोदींच्या पोस्टर्सवर काळं फासलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे.
भाजपकडून जोरदार आंदोलन
पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासण्याचं प्रकरणी भाजपकडून सोमवारी जोरदार आंदोलन करण्यात आलं. भाजपने हे प्रकरण उचलून धरत सोमवारी जिल्हा परिषदेच्या समोर जोरदार आंदोलन केलं. नागपूर जिल्हा परिषद समोर रस्त्यावरील वाहतूक भाजप कार्यकर्त्यांनी रोखून धरत रस्ता रोको आंदोलन केलं. नागपूरच्या जीपीओ चौक आणि उच्च न्यायालयाला जोडणारा हा रस्ता भाजप कार्यकर्त्यांनी अडवून धरला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :