BJP MLA Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस (Hill Line Police Station) ठाण्यातील (Thane) गोळीबार (Firing) प्रकरणी पोलीसच (Police) साक्षीदार (Witness) बनले आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडसह (Mahesh Gaikwad) राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यावर गोळीबार (Firing) केला होता. महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोरच ही गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे आता या प्रकरणी उपस्थित सर्व पोलिसांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.


उल्हासनगर गोळीबार प्रकरणी पोलीसच साक्षीदार


उल्हासनगर गोळीबार याप्रकरणी सर्व ऑनड्युटी उल्हासनगर हिललाईन पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या घटनेत साक्षीदार आहेत. त्यामुळे पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी असलेले साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून आता हिललाईन पोलिसांचे देखील जबाब नोंदवले जाणार आहेत. शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे गणपत गायकवाड सध्या अटकेत आहेत.


हिल लाईन पोलीस ठाणे गोळीबार प्रकरण


उल्हासनगर गोळीबार प्रकारणातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. ज्युपिटर हॉस्पिटल येथे महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. राहुल पाटील यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. तर, महेश गायकवाड यांच्यावर अजून देखील आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत. महेश गायकवाड यांची परिस्थिती अजून देखील चिंताजनक असून औषध उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.


वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच गोळीबार


भाजप आमदार गोळीबार प्रकरणात हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये गोळीबार घडला होता. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासह काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्षदर्शी बनले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी आमदार गायकवाड यांना गोळीबार करताना प्रतिकार केला होता.


प्रकरणी पुढील चौकशी सुरु


भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात सोमवारी कल्याण क्राईम ब्रांच, उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पथक दाखल झाले होते. तक्रारदार चैनू जाधव यांच्यासह महेश गायकवाड यांचा खाजगी अंगरक्षक शेखर धनवे यांची चौकशी करण्यात आली. महेश गायकवाड यांच्या हल्ला झाला त्यादरम्यान खाजगी अंगरक्षक शेखर धनवे याला केबिनमध्येच आमदार गायकवाड यांचे समर्थक सरवणकर आणि हर्षल केने यांनी मारहाण केली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं?