Kolhapur Crime News: शादी डॉट कॉम या वेबसाईटवर तरुणींशी ओळख करून त्यांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. सध्या एका महिलेची तब्बल 11 लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आल आहे. या घटनेची नोंद कोल्हापुरातील (Kolhapur Crime) जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. फिरोज निजाम शेख असं या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव आहे.


याबाबतच्या अधिक माहितीनुसार, कोल्हापुरातील एका घटस्फोटीत पीडित महिलेची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. शादी डॉट कॉम या वेबसाईटवरील अकाउंटवरून पुण्यातील एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. तिच्याशी ओळख करून हळूहळू प्रेम संबंध निर्माण केले. या ओळखीनंतर संशयित आरोपीने संबंधित पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत पैसे मागण्यास सुरुवात केली. यातून तब्बल 10 लाख 94 हजार रुपयांची रक्कम संशयिताने घेतली. पीडित महिलेला फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर जुना राजवाडा पोलिसात याबाबत तक्रार दिली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून आरोपीचाही शोध घेत आहे. 


खंडणीची मागणी करत दुकानदाराला जबर मारहाण 


पुण्यातील वारजे माळवाडी परीसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यात लॉन्ड्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराकडे खंडणीची मागणी करत या दुकानदाराला जबर मारहाण करण्यात आले आहे. यातील सराईत गुन्हेगाराविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ओंकार उर्फ खंड्या वाघमारे (वय २१,) असं खंडणी मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सध्या वारजे पोलिसांकडून या आरोपीचा शोध सुरू आहे.  


दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे शिवणे परिसरात दांगट पाटीलनगर येथे लाँन्ड्रीचे दुकान आहे. तीन दिवसांपूर्वी आरोपी वाघमारे तिथे आला होता. त्याने या दुकानदाराला धमकी दिली. 'या भागाचा मी दादा आहे. या भागात व्यवसाय करायचा असेल, तर दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल', असे म्हणत पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी त्याने दिली. आरोपी वाघमारे याच्याकडे एक गज होता. आरोपीने दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील केली. तसेच त्याने एका गाडीची काच फोडत खंडणी मागितल्याची ही माहिती पोलिसानी दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या