Walmik Karad :  बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे.  वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावरही मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा, यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि विरोधकांचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.


वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक


तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या मातोश्री आता मैदानात उतरल्या आहेत. लेकाच्या न्यायासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी परळी पोलीस स्टेशनबाहेर (Parli Police Station) ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. अशातच आता परळीत (Parli) वाल्मिक कराडचे (Walmik Karad) समर्थक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. परळीच्या राणी लक्ष्मीबाई टॉवरवर हे समर्थक चढले असून या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. परळीत दोन ठिकाणी कराड समर्थकांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात कराड विरुद्ध देशमुख असा वाद रंगण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.


थेट टॉवर वर चडून शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात   


खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या आईने आता न्यायायासाठी परळीतील शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत माझ्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे कराड यांच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.. वाल्मिक कराड यांना  आज केजच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणात १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज याची मुदत संपत असल्याने केजच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळपासून परळीत वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई बाबूराव कराड यांच्यासह शेकडोंनी परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडत गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली असून परळी शहर पोलीस ठाण्यात महिलांची मोठी गर्दी जमाझाली आहे.


परळीकरांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा 


दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणात जातीय द्वेषातून राजकीय दबावापोटी कार्यवाही न करता निष्पक्षपणे चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा देत परळीकरांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, स्व. संतोष भैय्या देशमुख यांची हत्या झाली त्यामध्ये पोलिस प्रशासनाने आरोपी अटक केलेली आहेत. महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या तपासयंत्रणा योग्य तो तपास करत आहेत. आवश्यक ते पुरावे असतील आवश्यक असलेले आरोपी असतील त्यांना अटकही केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची मिडीया ट्रायल, परळी व बीड जिल्ह्याची बदनामी करून जातीयद्वेष पसरवत आहेत त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. 


माझ्या लेकरावर झालेला अन्याय दूर करा- पारुबाई कराड


माझ्या लेकरावर झालेला अन्याय दूर करा, त्याच्यावर दाखल झालेले सगळे गुन्हे खोटे आहेत, असे कराड याच्या आई पारुबाई कराडने बोलताना सांगितले आहे. सुरेश धस,संदीप क्षीरसागर हे या प्रकरणात राजकारण करत असल्याचा देखील उपस्थित महिला सांगत आहेत. अशी प्रतिक्रिया देत वाल्मिक कराडच्या मातोश्री पारुबाई कराड यांनी महिलांसह पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या देत आंदोलन सुरू केले आहे.


हे ही वाचा