Beed:मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उंच टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी गावात तणाव वाढला होता. गावातील महिलांसह ग्रामस्थ आक्रमक होते. सर्व आरोपींना पकडून वाल्मिक कराडांवर मोक्का लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यानंतर या प्रकरणात नवी SIT स्थापन झाली असली तरी धनंजय देशमुख नाराजच असल्याचं चित्र आहे. SIT मध्ये दोन नावे आम्ही सुचवले आहेत. त्यासाठी हत्याप्रकरणातल्या आरोपींच्या कारवाईबाबत धनंजय देशमुख आज बसवराज तेली साहेबांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले.(Santosh Deshmukh Case)
दरम्यान, खंडणी ते खुनप्रकरण यात कटकारस्थान करणारे आरोपी हे एकच आहेत. माझ्या भावाची हत्या करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून 302 अंतर्गत फाशी लावावी ही माझी मागणी असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले आहेत. दरम्यान आंदोलनानंतर धनंजय देशमुख कोणतं पाऊल उचलतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. वाल्मिक कराड, हत्याप्रकरणातल्या आरोपींच्या कारवाईबाबत धनंजय देशमुख आज बसवराज तेली साहेबांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले. मस्साजोगमधल्या आंदोलनानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. धनंजय देशमुखांच्या या आंदोलनात मनोज जरांगे सहभागी झाल्याने येत्या काही दिवसात आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
माझ्या भावाची हत्येची सुरुवात खंडणीतून झाली. त्यामुळे आमची मागणी आहे की दोन्ही प्रकारचे आरोपी एकच आहेत. SIT मध्ये दोन नावं आहेत. त्यांचा अजून समावेश झालेला नाही. त्यांची नावं समाविष्ट होतील अशी अपेक्षा आहे. नवीन SIT मधील कोणत्याही अधिकाऱ्यावर आक्षेप नाही. असं धनंजय देशमुख म्हणाले. खंडणी ते खून प्रकरण यातील ते कटकारस्थान करणारे जे आरोपी आहेत त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करून 302 अंतर्गत फाशी लावावी ही माझी मागणी आहे.या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.
बीडमध्ये आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
देशमुख कुटुंबीयांना आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील सातत्याने सहभागी होत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे.
हेही वाचा: