मुंबई : खार पोलिसांकडून एका व्यक्तीला आरोपी बनवण्यासाठी त्याच्या खिशात 20 ग्रॅम MD ड्रग ठेवण्यात आले. पोलिसांचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आणि नंतर ते व्हायरल झाले. सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर खार पोलिस स्टेशनमधील चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणात तिथे गेलेल्या पोलिसांपैकी एकाने या व्यक्तीच्या खिशात अमली पदार्थ ठेवल्याचे निदर्शनास आले. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांकडून बोगस आरोपी बनवण्यासाठी करण्यात आलेल्या या कृत्यामुळे मुंबई पोलिसांचा बदनामी झाली आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिसांवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न मुंबईकरांचा मनात निर्माण झाला आहे.
नेमकं काय घडलं?
खार परिसरात 30 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. गोठ्यात काम करणाऱ्या डॅनियलला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून खार पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या खिशात 20 ग्रॅम मेफेड्रोन सापडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासण्यात आले. त्यामध्ये पोलिस असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती डॅनियलच्या खिशात काही तरी ठेवत असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने डॅनियलला सोडले. तसेच त्याला केवळ संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते असे सांगणयात आले. मात्र सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चारही अधिकारी आणि अंमलदारांना निलंबित केला आहे.
ही बातमी वाचा: