Thane : चोरी करण्यासाठी चोर काय काय युक्ती करतील याचा काही नेम नाही. ठाण्यातील परिसरात चोरी करण्यासाठी चक्क बेडूक उड्यांचा वापर करत चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या कळवा पोलिसांनी आवळल्या आहेत. सीसीटीव्हीमध्ये आपण दिसू नये यासाठी बेडूकऊड्या मारून चोरी करत असल्याची कबुली या अट्टल चोरांनी पोलिसांकडे दिली आहे. 


संशयितपणे फिरत असलेल्या क्रिश लोटावानी या तरुणाला ताब्यात घेतले


कळवा पारसिक नगर परिसरात 24 ऑगस्ट रोजी  एका मेडिकलमध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. फिर्यादीने तक्रार केल्यानंतर कळवा पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. सुरुवातीला याच परिसरात संशयित पद्धतीने फिरत असलेल्या क्रिश लोटावानी या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. क्रिश याच्याकडे पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर साथीदारांची देखील नावे सांगितली. मात्र या चोऱ्या ते कशा पद्धतीने करत होते. याची माहिती जेव्हा या चोरांनी दिली तेव्हा पोलिसांना देखील आश्चर्य वाटले.


बेडूक उड्या मारून हे सर्व चोरी करत असल्याचे चोरांनी सांगितले


सीसीटीव्हीमध्ये चेहरे कैद होऊ नये यासाठी चक्क बेडूक उड्या मारून हे सर्व चोरी करत असल्याचे या चोरांनी सांगितले. या चोरांचे बेडूक उड्या मारून चोरी करताना सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून एक फरार आहे. या अट्टल चोरट्यांकडून एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर अधिक तपास कळवा पोलीस करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Kolkata Rape Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी तुरुंगातील चपाती-भाजी खाऊन वैतागला; अंडी आणि चाऊमीनची केली मागणी अन्...