एक्स्प्लोर

Ketan Agrawal Case, Pune: बी.कॉमला असलेल्या 20 वर्षांच्या सिया गोयलचा प्लॅन A फसला, पण प्लान B सक्सेसफुल, केतनला मारण्याचा प्लॅन C काय होता?

Ketan Agrawal Case, Pune: केतनला मारण्यासाठी प्लान A तयार केलेला, जेव्हा प्लान A अयशस्वी ठरला, तेव्हा सिया गोयल आणि चेतन चौधरीनं प्लान B आखला. इतकंच नाही तर, तो प्लॅनही फसला असता तर काय करायचं? यासाठी सियानं आधीच 'प्लॅन सी' (Plan C) देखील तयार ठेवलेला.

Ketan Agrawal Case, Pune: पुण्याच्या (Pune Crime) केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात (Ketan Agrawal) अनेक महत्त्वाचे आणि खळबळजनक खुलासे झाले आहेत. आधी सर्वांना अपघातील मृत्यू वाटणाऱ्या प्रकरणात पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि होणाऱ्या नवऱ्याचा बॉयफ्रेंडसोबत मिळून काटा काढणाऱ्या सिया गोयल (Siya Goyal) हिचं पितळ उघडलं पडलं. केतन अग्रवाल याला त्याची होणारी पत्नी सिया गोयलनं 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिनं तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी (Chetan Chaudhary) याच्या मदतीनं त्याच्या हत्येचा कट रचला. 

प्रत्यक्ष हत्येच्या चार दिवस आधीच, सिया गोयलनं केतनला दरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मारण्यासाठीचा तो प्लॅन A (Plan A) होता. जेव्हा प्लॅन A अयशस्वी ठरला, तेव्हा सिया गोयल आणि चेतन चौधरीनं प्लॅन B (Plan B) आखला. इतकंच नाही तर, तो प्लॅनही फसला असता तर काय करायचं? यासाठी सियानं आधीच प्लॅन C (Plan C) देखील तयार ठेवला होता.

केतनला मारण्यासाठीचा प्लॅन A काय होता आणि तो का फसला? (Siya Goyal Ketan Agrawal Case)

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी ANI शी बोलताना धक्कादायक खुलासा केला, ते म्हणाले की, सिया आणि केतन यांनी लोहगड किल्ल्याला तीन वेळा भेट दिली होती. 14 जून रोजी, म्हणजेच हत्येच्या चार दिवस आधी, सिया केतनला लोणावळाला लोहगडावर घेऊन गेली. हा तिच्या कटाचा प्लॅन A होता. याच भेटीदरम्यान सियानं केतनच्या जीवावर पहिला प्रयत्न केला. तिनं त्याला किल्ल्यावरून दरीच्या दिशेनं ढकललं. पण, केतननं एका झुडपाला पकडलं आणि त्याचे प्राण वाचले. आपलं गुपित उघड होण्याच्या बेतात असतानाच सियानं चलाखीनं "साप! साप!" असं ओरडत केतनला जाऊन मिठी मारली. केतनला वाटलं की, तिथे खरोखरंच साप होता आणि सापापासून वाचवण्यासाठीच सियानं त्याला ढकललं होतं.

प्लॅन B फत्ते झाला खरा, पण तो जर फसला असता तर, प्लॅन C सुद्धा होता...

केतन अग्रवालच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, 19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता. याच्या एक दिवस आधीच सियानं प्री-बर्थडे सरप्राइजच्या निमित्तानं केतन अग्रवालला लोणावळ्यातील लोहगढ किल्ल्यावर नेलं. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सिया गोयल आणि केतन अग्रवाल लोहगडावर होते, त्याचवेळी सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीसुद्धा तिथे उपस्थित होता. चेतननं त्याचा मोबाईल कोंढवामधल्या आपल्या घरी ठेवलेला, तसेच, त्याच्या मोबाइलचं इंटरनेट सकाळपासून बंद होतं. त्यानंतर त्यानं स्वतःची ओळख लपवण्यासाठी हुडी घातलेलं आणि चेहरा पूर्णपणे लपला जाईल, याची काळजी घेतलेली. चौकशीदरम्यान, एवढ्या भर उन्हात थंडी वापरलं जाणं हुडी कोण घालतं? असा संशय पोलिसांना आला आणि तिथेच सिया आणि चेतननं रचलेला मोठा कट फसला. हुडी घालून गडावर जातानाचा चेतनचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागला. 

लोहगडावर केतन आपल्या मोबाईलनं फोटो काढत असतानाच सियानं त्याला दरीत ढकललं. त्यानंतर तिनं पोलिसांना फोन करुन सांगितलं की, केतनचा पाय घसरलाय आणि तो खाली पडला. पोलीस आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. सर्वांना अपघाती मृत्यू वाटला आणि सिया गोयलचा प्लॅन B (Plan B) यशस्वी झाला. 

सिया गोयलचा प्लॅन C सुद्धा रेडी होता? 

केतनच्या वडिलांचा आरोप आहे की, सियानं त्यांच्या मुलाच्या हत्येचा मोठा कट रचला होता. जर लोहगडावर प्लॅन B अयशस्वी ठरला असता, तर महाबळेश्वरमध्ये केतनचा जीव घेण्याचा सियाचा इरादा होता. तिनं चेतनच्या मदतीनं आधीच प्लॅन C (Plan C) तयार करून ठेवला होता. 

केतन, सियामध्ये वारंवार उडायचे खटके

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये दोघांचं लग्न ठरलेलं, त्यानंतर साखरपुडाही ठरलेला. पण, त्यानंतर दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी क्राइम ब्रांच आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपास करुन प्रकरणाचा छडा लावला. 

नेमकं प्रकरण काय?

पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला आहे. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा एक थंड डोक्याने केलेला 'मर्डर प्लॅन' असल्याचं निष्पन्न झालंय. अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अगरवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालंय..सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेला होता..यावेळी फोटोसाठी पोज देताना सियाच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. केतनची हत्या एक अपघात असल्याचा प्लॅन होता असं सिया आणि तिच्या प्रियकराला दाखवायचं होतं. पण एका सीसीटिव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्याने दोघांनी केतनची हत्या केल्याचं उजेडात आलं. 

VIDEO पुण्यातल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा रक्तरंजित थरार, Inside Story

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ketan Agrawal Death Case, Pune: केतन अग्रवालला संपवण्यासाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? पुण्यातील भयंकर प्रकरणाची इनसाईड स्टोरी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महिला जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागाराला 60 हजारांची लाच घेताना अटक, जालना ACB ची कारवाई
महिला जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागाराला 60 हजारांची लाच घेताना अटक, जालना ACB ची कारवाई
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर ठरला आयुष्याचा शेवट; घरी जाताना दुचाकी घसरली, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू
शेवटचा पेपर ठरला आयुष्याचा शेवट; घरी जाताना दुचाकी घसरली, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget