Crime News : कोझिकोड : नातीवर अत्याचार केल्याप्रकरणी 62 वर्षीय व्यक्तीला केरळमधील (kerala) एका कोर्टानं दोषी ठरवत एकूण 111 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्या व्यक्तीला जास्तीत जास्त 30 वर्षांचा तुरुंगवास (sentenced) भोगावा लागणार आहे. कारण, वेगवेगळ्या कलमांअतर्गंत (POCSO) मिळालेली शिक्षा एकत्र सुरु होणार आहे. 2021 मधील झालेल्या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने बुधवारी निर्णय दिला. कोझिकोडमध्ये हे प्रकरण घडलं होतं.


कोझिकोडच्या कोर्टानं 62 वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात (POCSO)  शिक्षा सुनावली. नातीवर अत्याचार केल्याप्रकरणी कोर्टाने 62 वर्षीय व्यक्तीला 111 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2021 मधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात 62 वर्षीय व्यक्ती दोषी आढळला. त्याने नातीवर अत्याचार केला होता. कोर्टानं त्या व्यक्तीला 111 वर्षांची शिक्षा सुनावली. त्याशिवाय त्याला दोन लाख 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय. 62 वर्षीय व्यक्तीला जास्तीत जास्त 30 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. 


सरकारी वकील (पीपी) मनोज अरूर म्हणाले की, "नादापुरम विशेष ट्रायल कोर्टाचे (POCSO) न्यायाधीश सुहैब एम यांनी आरोपीला लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (POCSO) विविध कलमांतर्गत एकूण 111 वर्षांची शिक्षा सुनावली. दोषीवर 2.10 लाख रुपयांचा अर्थिक दंडही ठोठावलाय. कोर्टानं सुनावलेली शिक्षा वेगवेगळ्या कालावधीसाठी आहे, ती एकत्र चालणार आहे. आरोपीला सुनावण्यात आलेल्या शिक्षेत सर्वात मोठी शिक्षा 30 वर्षांची आहे. त्यामुळे दोषीला 30 वर्षे तुरुंगात राहावे लागेल. उर्वरित शिक्षा एकाच वेळी चालतील आणि कालबाह्य होतील."


सरकारी वकील (पीपी) मनोज अरूर यांनी सांगितलं की, डिसेंबर 2021 मध्ये हे प्रकरण घडलं होतं. नात ख्रिसमसच्या सुट्टीत आजोबांकडे आली होती, त्यावेळी ही घटना घडली. नातीला एकटं पाहून आजोबानं हे गैरकृत्य केले. त्यानंतर कुणाला सांगू नको... असे म्हणत आजोबाने नातीला धमकावलं. आजोबाच्या धमकीला नात घाबरली होती. आपल्यासोबत घडलेला प्रसंग तिने शाळेत गेल्यानंतर मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर आजोबाचं गैरकृत्य सर्वांच्या समोर आले. त्यानंतर मुलीच्या घराच्यांनी पोलिसांत धाव घेतली. हे प्रकरण कोर्टात पोहचलं. कोर्टानं आजोबाला दोषी ठरवलं अन् पॉस्को कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांअतर्गंत 111 वर्षांची शिक्षा आणि दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. 


हे ही वाचा :


Job Majha : इस्रोमध्ये भविष्य घडवण्याची तरुणांना संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, तर नवी मुंबई महानगरपालिकेतही रिक्त जागांसाठी पदभरती


Oil India Recruitment 2024 : ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये 421 पदांसाठी बंपर भरती, अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी