Health Tips : हिवाळ्यात (Winter Season) वातावरणातील बदलामुळे शारीरिक भूक वाढते. सतत काहीतरी खावंसं वाटतं. या काळात खरंतर आपलं वजन मेंटेन करणं फार कठीण असतं. कारण थंडीमुळे फारसा व्यायामही लोक करायला कंटाळा करतात. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात आणि भूकही लागते. त्यामुळे आपले वजन वाढू लागते. अशा वेळी आपलं वजन राखण्यासाठी आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. वजन मेंटेन करण्यासाठी केलेल्या आहारामध्ये दिवसभर खाण्याचे अनेक पर्याय असतात. पण, सकाळचा नाश्ता नेमका कोणता असावा असा अनेकांना प्रश्न पडतो. 


जर तुम्हालाही तुमचं वजन नियंत्रित ठेवायचं आहे आणि सकाळचा नाश्ता कोणता निवडायचा याबाबत प्रश्न पडत असेल तर याच संदर्भात अधिक माहिती आम्ही तुमच्यासाठी देणार आहोत.


ढोकळा


आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ढोकळा हा एक गुजराती पदार्थ आहे. ढोकळा देशभरात फार प्रसिद्ध आहे. अनेकजण तो आवडीने खातात. हा बेसन पिठापासून बनवला जातो. वाफवलेला असल्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात कॅलरीज वाचवण्यास मदत होते. डोकळा तळलेला नसल्यामुळे त्यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी असते. ढोकळा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे बेसन आणि दही हे प्रथिने आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे.


इडली


इडली हा दक्षिण भारतीय पदार्थ देशभरात मोठ्या उत्साहात खाल्ला जातो. इडली तेलात तळली जात नाही त्यामुळे वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे. त्यात फॅटचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे कॅलरीजही खूप कमी असतात.


डाळ फार्रा


हा एक स्वादिष्ट उत्तर भारतीय नाश्ता आहे. हा पदार्थ तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा नाश्त्यात सहज खाऊ शकता. यामध्ये वापरलेले वाफवलेले भजी भरण्यासाठी मसूराचे स्वादिष्ट मिश्रण वापरले जाते. साधारणपणे हरभरे, उडीद आणि मटर डाळ घालून बनवलेले फर्रा आरोग्यासाठी आणि चव या दोन्हीसाठी उत्तम आहे.


पातोळ्या 


पातोळ्या हा पानांत उकडला जाणारा पदार्थ आहे. हा एक गोड पदार्थ आहे. तांदूळ, सुके खोबरे, गूळ आणि वेलची पावडर यांच्या मिश्रणाने तयार करण्यात आलेला हा पदार्थ महाराष्ट्रात आवडीने खाल्ला जातो.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सावधान! स्ट्रीट फूडमध्ये वारंवार वापरलं जाणारं तेल आरोग्यासाठी घातक; 'या' आजारांचा वाढता धोका