एक्स्प्लोर

KDMC : कंत्राटी चालकाकडून चक्क आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग, पैसे वसुलीसाठी की इतर काय कारण?

ठाणे : कंत्राटी कामगार अधिकाऱ्यांसाठी पैशांची वसुली करत असल्याची चर्चा आहे.  या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले.

Crime : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणं पालिकेच्या  एका कंत्राटी वाहन चालकाला चांगलेच अंगलट आले आहे. महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी या कर्मचाऱ्यांची चौकशी करत संबंधित विभागास कारवाई करण्यास सांगितले . ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काही अधिकारी बचावात्मक पवित्रा घेत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले.

धर्मेंद्र सोनवणे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांचा केडीएमसीच्या अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी दौरा होता. या दौऱ्यादरम्यान आयुक्त जाखड यांच्या गाडीचा धर्मेंद्र सोनवणे हा कंत्राई चालक दुचाकीने पाठलाग करत होता. ही बाब लक्षात येताच आयुक्तांनी त्याच्या गळ्यात असलेले आय कार्ड पाहिले. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करत सोनवणे यांची चौकशी केली. संबंधित विभागाला सोनवणे याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करत योग्य ती कारवाई करणार असल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले. यादरम्यान आयुक्त कोणत्या परिसरात जात आहेत हे पाहण्यासाठी धर्मेंद्र सोनवणे आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करत होता. याबाबत सोनवणे कुणाला तरी माहिती देत असल्याचे बोलले जात आहे. सोनवणे कुणाला काय माहिती देत होता हे  चौकशी नंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे भूमाफियांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. आयुक्त यांच्या दौऱ्याआधीच सगळं सुस्थितीत असल्याचे दाखवून द्यायचे असल्याने आयुक्तांच्या दौऱ्याची माहिती काढण्यासाठी हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या संपूर्ण प्रकरणाची  चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सदर चालक का बड्या अधिकाऱ्यांची वसुली करत असल्याची माहिती समोर आली आहे.

कारणे दाखवा नोटीस  - 

सोनवणे या कर्मचाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशादरम्यान सोनवणे याला कारणे दाखवा नोटीस सामान्य प्रशासन विभागाने धाडली असून त्याच्यावरती कारवाई का करू नये ? याबाबत त्याच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. हा कर्मचारी नेमकं कशासाठी आयुक्तांचा पाठलाग करत होता याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हप्ता वसुली -

आयुक्तांचा पाठलाग करत असल्याची बातमी शहरभर पसरल्यामुळे  शहरात चर्चेला उधाण आले आहे.  सोनवणे हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हप्ता वसूल करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या चौकशी बरोबरच अधिकाऱ्यांची चौकशी होते की काय याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे अधिकारी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार सोनवणे हा फेरीवाल्यांकडून अवैध्यरीत्या हप्ते वसुली करतो, आणि तेच हप्ते अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आलेय. त्यामुळे अधिकारी तूर्तास घाबरलेले दिसून येत आहेत. अधिकाऱ्यांकडे विचारण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. मात्र एवढी गंभीर घटना समोर आल्याने आता आयुक्त काय कारवाई करतात? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Jalna Weather Station Tampering : जालन्यात 40 स्वयंचलित हवामान केंद्रांत छेडछाड, पर्जन्यमापकावर बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप
जालन्यात 40 स्वयंचलित हवामान केंद्रांत छेडछाड, पर्जन्यमापकावर बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप
धक्कादायक! बेकरीतील केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी बदलापुरात दाखल
धक्कादायक! बेकरीतील केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी बदलापुरात दाखल
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget