एक्स्प्लोर

40 लाखांच्या खंडणीसाठी नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण, तीन दिवसांत केली मुलाची सुखरूप सुटका

अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरातील ग्रीन सिटी संकुलात सोनू सबिता हे आपल्या कुटुंबासह राहतात. सोनू सबिता यांचा वडापावचा व्यवसाय आहे.

कल्याण : घराच्या दिशेने शिकवणीहून निघालेल्या नऊ वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याच्या नातेवाईकांना 40 लाखाची खंडणी देण्यासाठी धमकावण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. याप्रकरणी आंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अंबरनाथ पोलिसांसह  कल्याण, ठाणे, उल्हासनगर क्राइम ब्रांचने समांतर तपास सुरू केला. अखेर पोलिसांनी तीन दिवसात सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे 9 वर्षाच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका केली आहे. तर त्याचे अपहरण करणाऱ्या चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अमजद खान, छोटू सिंग ,योगेंद्र सिंग आणि सुनील लाड  अशी या आरोपीची नावे आहेत.

 अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरातील ग्रीन सिटी संकुलात सोनू सबिता हे आपल्या कुटुंबासह राहतात. सोनू सबिता यांचा वडापावचा व्यवसाय आहे. 8 सप्टेंबर रोजी त्यांचा 9 वर्षाचा मुलगा कृष्णा  नेहमीप्रमाणे सायंकाळी 7 वाजता शिकवणीहून घरी जाण्यासाठी निघाला मात्र तो घरी पोहचला नाही. बराच वेळ उलटूनही कृष्णा  घरी न पोहचल्याने सोनू यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच न सापडल्याने अखेर त्यांनी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 संवेदनशील घटना असल्यामुळे पोलिसांनी रात्रभर त्यांच्या ओळखीचे आणि नातेवाईकांकडे मुलाचा शोध घेतल्यानंतर अखेर गुरुवारी अंबरनाथ पोलिसांसह ठाणे गुन्हे शाखेने ,कल्याण गुन्हे शाखा आणि उल्हासनगर गुन्हे शाखा यांच्या बरोबर समांतर तपास सुरु केला. याच दरम्यान गुरुवारी संध्याकाळी मुलाच्या काकाला 40 लाख रुपयाची खंडणी न दिल्यास मुलाबरोबर त्याच्या वडिलांना मारण्याची धमकी देण्यात आली. मात्र परत अपहरणकर्त्यांनी फोन न केल्याने गुंता वाढला होता. मात्र पोलिसांनी पाच टीम सक्रिय करतानाच त्यांना वडिलांच्या दुकानाशेजारी असलेल्या सीसीटीव्हीत आणि त्याच्या घराबाहेर मुलासोबत मैत्री करणारे काही संशयित चेहरे दिसले. तर मुलगा हरविल्यानंतरही अमजद खान हा आरोपी मुलाबरोबर असल्याचे दिसल्याने पोलिसांनी अमजद खानचा शोध सुरु केला. हे तिन्ही आरोपी ज्या मिठाईच्या दुकानात काम करत होते त्या दुकानातून त्यांचा मोहने परिसरातील पत्ता मिळवून आज दुपारी पोलिसांनी अमजद खानच्या राहत्या घरी धाड टाकली असता अमजदसह हा चिमुरडा त्याच्या घरात सापडून आला. 

पोलिसांनी अमजदला पकडल्याचे कळताच त्याचे इतर दोन साथीदार चार चाकीने इगतपुरीच्या दिशेने पळाले. त्यांनी आधीच उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसचे तिकीट बुक केले होते. मात्र पोलिसांनी नाकाबंदी करत या दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले तर फोन वरून धमकावणाऱ्या चौथ्या आरोपीला देखील पोलिसांनी बेड्या ठोकत या मुलाला त्याच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्द केले. अवघ्या चार दिवसात आपल्या मुलाची सुखरूप सुटका केल्याने सोनू यांनी पोलिसांचे आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget