कल्याण : मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधून पैसे आणि दागिने चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला  कल्याण रेल्वे क्राईम ब्रान्च पोलिसांनी (Kalyan Railway Crime Branch Police)  बेड्या ठोकल्या आहेत. शहजाद सय्यद असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून आतापर्यंत 13  गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून तब्बल 21 लाख 68  हजार किंमतीच्या 417 ग्राम सोन्याच्या 13 लगडी हस्तगत करण्यात आल्या आहेत .


काही दिवसापासून कल्याणहून कसारा आणि कजर्तच्या दिशेने जाणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या. विशेष म्हणजे मेल एक्सप्रेसगाडयांमध्ये महिलांच्या पर्स चोरीच्या घटना दास्त घडत होत्या. महिला प्रवाशांच्या पर्समध्ये हात टाकून चोरटा मोठ्या शिताफीने महागड्या वस्तू आणि पैसे लंपास करत होता. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रान्च या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिस आयुक्त कैसर खालीद यांच्या मार्गदर्शनाखाली पा कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्शद शेख, पोलिस अधिकारी प्रकाश चौगुले,शंकर परदेशी  पोलिस हवालदार रंजीत रासकर, वैभव जाधव, अजित माने, अक्षय चव्हाण यांचे पथक या चोरट्याच्या शोधात होते.


 कल्याण रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही फूटेजमध्ये (CCTV) एक संशयित पोलिसांच्या नजरेत आला. काही दिवसापूर्वी हा संशयित तिकडे फिरत असताना पोलिसांनी पाहिले होते. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली . शहजाद सय्यद असे त्याचे नाव असून  शहजाद हा मूळचा अजमेर येथे राहणारा आहे . सध्या तो कल्याणच्या पत्रीपूल परिसरात भाडयाने खोली घेऊन राहत होता. 2017 मध्ये अहमदाबाद पोलिसांनी शहजादला रेल्वेतील चोरीच्या प्रकरणात अटक केली.  कल्याणमध्ये त्याने 13 चोऱ्या केली असल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास रेल्वे क्राईम ब्रान्च पोलिस करत आहेत.


संबंधित बातम्या :