Kalyan Crime News: एका तरुणाने प्रेमविरहामुळे प्रेयसीच्या नवीन प्रियकराची हत्या केल्याची घटना कल्याण पूर्वेत (Kalyan East News) घडली होती. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी (Kolshewadi Police News) गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आणि अवघ्या 24 तासात पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित उजैनकर याच्यासह त्याचे साथीदार नकुल भोईटे ,राहुल चव्हाण ,सागर गांगुर्डे यांना अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील खडेगोलवली परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात एका तरुणाची चाकूने हल्ला करत काही जणांनी हत्या केल्याची घटना घडली होती. आदित्य बर असं मयत तरुणाचं नाव असून ही हत्या ललित उज्जैनकर आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचं तपासात उघड झालं होतं. ललित उज्जैनकर याचे दिवा येथे राहणाऱ्या एका मुलीशी काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांचं काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झालं होतं.


काही कारणास्तव दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कारणास्तव या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झालं. त्यानंतर सदर मुलीची गोवंडी येथे राहणाऱ्या आदित्य याच्याशी मैत्री झाली. प्रेम संबंध तुटल्याने ललित उज्जैनकर हा संतापला होता. ललितकडे त्या मुलीच्या भावाचा कुत्रा सांभाळण्यासाठी होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास ती मुलगी आणि आदित्य हे दोघे हा कुत्रा घेण्यासाठी खडेगोलवली परिसरात आले. यावेळी ललितचा ती मुलगी आणि आदित्य सोबत  वाद झाला.


हत्या केल्यानंतर आरोपी साथीदारांसह फरार


या वादातून ललितने आपल्या साथीदारांसह आदित्यवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आदित्यचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ललित आपल्या साथीदारांसह पसार झाला होता. कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत ललित उज्जैनकर व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. ललितचा एक साथीदार अवघ्या काही तासातच पोलिसांच्या हाती लागला. त्याने दिलेल्या माहितीनुसार  ललित व त्याचे उर्वरित साथीदार हे मध्य प्रदेश येथे पळून गेले होते. अवघ्या 24 तासात पोलिसांनी ललितसह त्याचे फरार साथीदार नकुल भोईटे ,राहुल चव्हाण ,सागर गांगुर्डे यांना बेड्या ठोकल्या आहेत. 


ही बातमी देखील वाचा


कृष्णभक्त असलेल्या महिला IPS अस्लम खान यांचा प्रेरक प्रवास, गरीबीतून गाठलं यश, नावामागची स्टोरीही रंजक