Bank Clean Note Policy:  सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. दररोज नवनवे मेसेज व्हायरल होत असतात. त्यातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजवर सहज विश्वास ठेवला जातो, त्या मेसेजची पडताळणी केली जात नाही. आता सोशल मीडियावर नोटासंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. 100, 200, 500 आणि दोन हजारांच्या नोटांवर पेनानं लिहिलेलं असेल तर त्या नोटा चलनात घेतल्या जात नाहीत... असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  याबाबत पीआयबीनं (Press Bureau of India) फॅक्ट चेक केलेय. पाहूयात काय आहे, या मेसेजमागील सत्य... 


बँक नोटावर (Banknote) काही लिहिलेल्यामुळे त्या चलनातून बाद होत नाहीत. पण भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) याची लोकांनी चलनी नोटावर (Currency notes)काहीही लिहू नये अशी आपेक्षा आहे. कारण, नोटांवर काही लिहिल्यानंतर त्या खराब होतात, त्याशिवाय त्याचं वय कमी होतं. त्यामुळे तुमच्याकडे 200 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये, 100 रुपये, 50 रुपये अथवा 20 रुपयांच्या नोट असतील अन् त्यावर काही लिहिलेलं असेल तर त्या नोटांना तुम्ही वैध मानू शकता. त्या नोटा चलनातून बाद होत नाहीत. सरकारच्या अधिकृत फॅक्ट चेक पीआयबीनं (PIB Fact Check) सोशल मीडियावर (Social media) नोटासंदर्भात व्हायरलर होणाऱ्या दाव्याला उत्तर दिलेय. 






व्हायरल मेसेजमध्ये काय दावा?


सोशल मीडियावर नोटासंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये असा दावा केलाय की, आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, 200 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये, 100 रुपये, 50 रुपये अथवा 20 रुपयांच्या नोटांवर काही लिहिलेलं असेल तर त्या चलनातून बाद असतील. पीआयबीनं दावा फेटाळून लावला आहे. अशा नोटा चलनातून बाद होत नाहीत. पण नोटांवर लिहू नका... असं म्हटलेय. त्याशिवाय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका... त्याची पडताळणी करा.. असं म्हटलेय. 


 Reserve Bank of India चं काय आहे म्हणणं...


Reserve Bank of India च्या चलनी नोटासंदर्भातील धोरणानुसार, नोटांवर काहीही लिहू नये असं म्हटलेय. कारण, नोटा लवकर खराब होतात, तसेच त्या नोटाचं आयुष्य कमी होतं. पीआयबीनं म्हटलेय की, स्वच्छ नोट पोलिसीच्या धोरणांनुसार चलनी नोटावर काहीही लिहू नये... कारण नोटा खराब होतात..


बँकेत बदला नोटा - 
आरबीआयच्या नियमांनुसार, खराब झालेल्या अथवा फाटलेल्या नोटा बँक काऊंटवर तुम्ही बदलू शकता. त्या बदल्यात तुम्हाला नवीन चलनी नोटा दिल्या जातील.