Kalyan Crime News : खोट्या सह्यांच्या आधारे बँकेतून चार कोटी 11 लाख रुपये काढून पार्टनरची फसवणूक केल्याप्रकरणी मनसे कल्याण शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई व त्यांचे भाऊ कल्पेश देशाई या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. याबाबत कौस्तुभ देसाई यांनी मात्र हे आरोप खोटे असून पार्टनरला सर्व पैसे दिले आहेत. मात्र त्याला।जास्त पैसे पाहिजे असल्याने त्याने माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचे देसाई यांनी सांगितले.


मनसेचे कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्याचा भाऊ  कल्पेश देसाई यांचा वडीलोपार्जीत बांधकाम व्यवसाय आहे. कल्याणच्या महत्मा फुले पोलिस ठाण्यात मनसेच शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई व त्यांचे भाऊ कल्पेश देसाई यांच्या विरोधात त्यांच्या पार्टनरने चार कोटी 11 लाख रुपये अपहार केल्याच्या आरोप करत  महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याचे पार्टनर गणेश म्हात्रे यांनी  सांगितले की गौरीपाडा येथे वडिलोपार्जित 20 गुंठे जागा विकसीत करण्यासाठी कौस्तूभ देसाई यांच्यासोबत करार करयात आला होता. ड्रीम होम्स या संस्थेसोबत हा करार केला होता. पैशाच्या व्यवहारासाठी एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आल्याचे सांगितले गेले.  त्यासाठी गणेशकडून सर्व कागदपत्रे घेतली गेली. नंतर  कौस्तूभ देसाई यांनी ही बँक बरोबर सेवा देत नाही असे सांगत जी पी पारसिक बँकेत खाते उघडले.


दरम्यान गणेश म्हात्रे यांनी ऑडीट केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की, त्यांची चार कोटी 11 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक कौस्तूभ देसाई व त्यांच्या भाऊ कल्पेश यांनी केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे . एचडीएफसी बँकेतील खाते उघडले होते. ते उघडेल गेले नाही असे गणेश यांना खोटे सांगण्यात आले होते. मात्र फ्लॅट धारकांनी या बँकेत जे पैसे जमा केले होते. ते चार कोटी 11 लाख रुपये खोटय़ा सहीच्या आधारे कौस्तूभ व कल्पेश देसाई यांनीे काढून गणेश यांची फसवणूक केल्याचा आरोप गणेश यांनी केला आहे . या प्रकरणी म्हात्रे यांच्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कौस्तूभ देसाई यांनी मी पार्टनरला सर्व पैसे दिले आहे. त्यांना आणखीन पैशाची लालच झाली आहे. पैशासाठी माङयाविरोधात खोटानाटा आरोप करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात सर्व काही उघड होईल असे स्पष्ट केलं आहे.