Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत आहेत. पण आता या मालिकेत जग्गू आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन जोशी यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तर प्रदीप वेलणकर जग्गू आजोबांची भूमिका साकारणार आहेत. 

Continues below advertisement

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मोहन जोशींनी जगन्नाथ चौधरी हे पात्र साकारलं होतं. त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. पण आता ते मालिकेत दिसणार नसल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी मालिका का सोडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मालिकेत गेले अनेक दिवस जग्गू आजोबा दिसत नाही आहेत. मोहन जोशी यांची ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. नेहाने यशला होकार दिल्याचे जग्गू आजोबांना अद्याप समजलेले नाही. त्यांना हे समजल्यावर खूप आनंद होणार आहे. 

संबंधित बातम्या

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?

Aboli : अबोली मालिकेने गाठला 100 भागांचा टप्पा, उदय टिकेकरांची होणार धमाकेदार एन्ट्री

Band Bajaa Varaat : 'बँड बाजा वरात' म्हणजे प्री-वेडिंग धमाल : पुष्कराज चिरपुटकर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha