Kalyan News : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं, हे वाक्य कायम आपण ऐकत अथवा वाचत असतो. बरेचदा त्याची प्रचितीही येते. मात्र, प्रेमात आपल्या गर्ल फ़्रेंडला इंप्रेस करण्यासाठी बॉयफ्रेंडने असे काही कृत्य केलंय की त्याला सरळ तुरुंगात जावं लागलंय. यात या प्रियकराने एका डिजिडल शॉपमधून विक्रीसाठी ठेवलेल्या एक लाख दहा हजराचा मोबाईल लांपास केलाय.
विशेष बाब म्हणजे या घटनेत त्याची प्रेयसी देखील सहभागी असल्याची घटना उघड झाली आहे. कल्याण (Kalyan Crime News) पूर्वेतील मॅट्रो मॉल मधील रिलायंस डिजिडल शॉपमध्ये ही चोरीची घटना घडलीय. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्रेयसीला लेस्टस मोबाईलची गरज, प्रियकराचे वाट्टेल ते धाडस
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रेमीयुगल ठाण्यातील एकाच खाजगी कंपनीत कामाला आहे. ऑफिस कामासाठी लेस्टस व्हर्जन असलेल्या मोबाईलची गरज असल्याचे सांगून त्यांनी ही चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सागर साहू (रा.साकीनाका, मुंबई) आणि प्रियंका मेनन (रा. कल्याण) असे अटक केलेल्या प्रेमीयुगलाचं नाव आहे. अनोखळी मुलगा आणि मुलगी मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने शॉपमध्ये आले होते. त्यावेळी सिक्युरिटी पॉडवर विक्रीसाठी ठेवलेला एक लाख दहा हजार किमतींचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल ठेवला असता, हाच मोबाईल दोघांनी प्लॅन करून चोराला.
आपल्यावर कोणी लक्ष देत नसल्याचे पाहून त्या मुलीने मोबाईल तिच्या बॅगेत टाकला. मात्र, मोबाईल लंपास करतानाच चित्रीकरण शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोबाईल चोरीला गेल्याचे समजल्यावर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात मुलगा आणि मुली विरोधात गुन्हा दाखल केला.
बंटी बबली पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात मुलगा आणि मुलीची ओळख पटवून तपास सुरू केला असता, सागर आणि प्रियंका हे दोघे ठाण्यातील एका कन्सलस्टन ऑफिसमध्ये कामाला असतानाच दोघांचे प्रेमसंबंध जुळले. तसेच ऑफिस कामासाठी प्रियंकाला लेस्टस मोबाईलची गरज होती. मात्र, तो मोबाईल एक लाखांच्या वर किमतींचा असल्याचे त्यांची ऐपत घेण्याची नव्हती, असे असूनही दोघांनीही पहिल्यादा चोरीच धाडस करून हा मोबाईल चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली असून 18 ऑगस्ट रोजी दोघांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा