Gadchiroli News : गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यातील आरमोरी तालुका मुख्यालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोबाईल चार्जर न दिल्याच्या कारणावरून रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या एका 19 वर्षीय युवतीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. यात रेस्टॉरंट मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण मारहाणीची घटना कैद झाली असून ही चित्रफीत सध्या समाज मध्यामांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. तर परिसरातून या घटणेचा संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली असून सोहेल शेख (वय 30) आणि अयुब शेख असे संशयित आरोपीचे नाव असून दोघांविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटणेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मोबाईल चार्जर न दिल्याने मुलीला लथा बुक्क्यांनी मारहाण
आरमोरी शहरातील वडसा टी पॉईंट येथील एका रेस्टॉरंट मध्ये सोहेल शेख हा आपल्या पत्नीसोबत नाश्ता करण्यासाठी आला होता. कामानिमित्त तो बाहेर निघून गेल्यानंतर त्याच्या पत्नीने रेस्टॉरंटच्या काउंटरवर असलेल्या मुलीला चार्जर मागितला. मात्र तिने देण्यास नकार दिल्याने ही बाब आपल्या पतीला तीने सांगितली. तिथे लगेच पती सोहेल आला आणि त्या मुलीला बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी आपला मित्र अयुब शेख याला ही बोलावलं. तेव्हा त्यांनीही मुलीला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी सोहेल शेख आणि अयुब शेख या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र, अद्यापही या दोघांना अटक केलेली नसल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता पोलीस नेमकी काय आणि कधी कारवाई करते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
लोहारा परिसरात एकाची धारदार शस्त्राने हत्या
श्रावण सोमवार निमित्ताने बेलफुल विकासासाठी आलेल्या एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. लोहारा परिसरातील कमला पार्क येथे ही घटना घडलीय. रामनाथ सोनटक्के, (रा. घाटंजी रोड कोळंबी) असे मृतकाचे नाव आहे. तर ही हत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान अवधूतवाडी पोलिसांनी याप्रकरण खुणाचा गुन्हा दाखल केलाय. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनटक्के यांना कुठल्या कारणाने मारले अजून उघड झाले नाही. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कुमार चिंथा आणि पोलीस उपअधीक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळाला भेट दिली.
हे ही वाचा