कल्याण : प्रेमप्रकरणातून एका तरुणाचे अपहरण करुन त्याला कोंडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये (Kalyan Crime) उघडकीस आली आहे. कल्याण ग्रामीणमधील देवा ग्रुपने  हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. मारहाण झालेल्या तरुणावर कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याचे कुटुंब भीतीच्या वातावरणात आहे. 


तरुणाच्या संपूर्ण कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुलीला समजावलं पण तिने ऐकलं नाही  


मुलाचे वडील मोहन जाधव यांनी सांगितले की, त्याचा मुलगा कबीर जाधव याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. आम्ही दोन्ही कुटुंबीयांनी बसून मुलीसह मुलाची समजूत काढली होती. परंतु मुलगी ऐकण्यास तयार नव्हती. ती कबीरच्या संर्पकात आहे. आज टिटवाळा परिसरात कबीर, त्याचा भाऊ आणि काही जण फिरत असताना मुलीचा मामा आणि इतर तरुण आले. त्यांनी कबीरसह इतरांचे अपहरण करुन ते घेऊन गेले. नंतर बाकीच्या चार जणांना सोडून दिले. मात्र कबीर जाधवला बेदम मारहाण केली.


घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी सूत्रं हलवली. याची खबर लागताच अपहरण केलेल्या त्या तरूणांनी कबीरला खडकपाडा परिसरात जखमी अवस्थेत सोडून दिले .पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कबीर याचा जीव वाचला आहे. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत. 


भाजपच्या माजी नगरसेवक विरोधात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा 


कल्याणमधील भारतीय जनता पक्षाचे  माजी नगरसेवक आणि  बांधकाम विकासक मनोज रामशकल राय यांच्या विरोधात एका 40 वर्षीय महिलेने बलात्काराचा आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एकच खळबळ उडाली आहे.


या प्रकरणाची कोठेही वाच्यता करू नये म्हणून आपणास सतत मारहाण केली जात होती. आता हा सगळा प्रकार असह्य झाल्याने आणि आपणास लग्नाचे आमिष दाखवूनही ते मागील नऊ वर्षाच्या कालावधीत न पाळल्याने आपण ही तक्रार माजी नगरसेवक मनोज राय विरोधात तक्रार करत असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.


ही बातमी वाचा: