मुंबई: 'श्री देवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) च्या रिलीज नंतर सई ताम्हणकर (Sai Tamhankar)  पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसते आहे. मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला पहिला मराठी चित्रपट रिलीज झाला आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्स वरच्या 'भक्षक' मध्ये (Bhakshak) दिसणार आहे. या चित्रपटात सई जस्मीत गौर या एका पोलिस अधिकाऱ्याची ची भूमिका साकारणार आहे. 


'भक्षक' या चित्रपटाच्या माध्यमातून भूमी पेडणेकर , सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सईने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे आणि आता हा नवा रोल सई कसा साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. 


'भक्षक'मध्ये भूमी सई ताम्हणकर एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार तर आहेच, पण पुन्हा एकदा बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांसोबत ती ओटीटीवर दिसणार आहे.


अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. 'भक्षक'च्या ट्रेलर ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि आता 9 फेब्रुवारी ला भक्षक नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.


सई पहिल्यांदाच रेड चिली एंटरटेनमेंटसोबत हा खास प्रोजेक्ट करणार आहे आणि तिच्यासाठी हा चित्रपट खूप खास आहे. वर्षभरात सई नेहमीच वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. जस्मीत गौरला बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली भक्षक या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पुलकितने याचे दिग्दर्शन केले आहे. गौरी खान आणि गौरव वर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 


'भक्षक' च्या ट्रेलरमधील भूमीच्या डायलॉगनं वेधलं लक्ष 


'भक्षक' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका पत्रकाराची कथा मांडण्यात आली आहे जिला बालगृहात मुलींवरहोणाऱ्या अत्याचाराबद्दल कळते. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, असं म्हटलं जात आहे. 'क्या अब भी आप अपनी गिनती इंसानों में करते हैं? या अपने आपको भक्षक मान चुके हैं...?' या ट्रेलरमधील भूमीच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. भूमी आता भक्षकांचे सत्य समाजाच्या समोर आणू शकणार का? या प्रश्नाचं उत्तर आता भक्षक हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना मिळणार आहे. 


ही बातमी वाचा: