एक्स्प्लोर

Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका

Gold Chain Lost: बिहारचे आरोग्य मंत्री निशांत कुमार यांच्या स्वागतादरम्यान पुष्पहार घालण्यात व्यस्त असलेल्या एका नेत्यासोबत एक अजब घटना घडली. नेत्याच्या गळ्यातून सोन्याची चैन गायब झाली. या व्हिडिओवर युजर्सनीही जोरदार कमेंट्स केल्या आहेत.

Gold Chain Lost:  नेत्यांच्या स्वागतात अनेकदा लोक हातात फुलं आणि हार घेऊन लांबच लांब रांगेत उभे असलेले दिसतात. पण या वेळी नेत्याच्या स्वागताचा एक व्हिडिओ वेगळीच घटना समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक नेता बिहारच्या आरोग्य मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालताना दिसत आहे. याच दरम्यान त्यांच्या गळ्यात घातलेली सोन्याची साखळी गायब झाल्याची बाब समोर आली, ज्याची किंमत सुमारे ७ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासोबतच आपल्या मिश्किलपणे कमेंट्स करताना दिसत आहेत.(Gold Chain Lost)

Gold Chain Lost: मंत्र्यांचे स्वागत करायला पोहोचले होते नेते

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत मंत्र्यांचे स्वागत होताना दिसत आहे. एक नेता पुढे होऊन पुष्पहार घालताना दिसतो. मंत्र्यांच्या शेजारी लोकांची गर्दी आहे आणि त्यांच्या स्वागताचा सोहळा सुरू आहे. या स्वागताच्या कार्यक्रमादरम्यान कॅमेऱ्यात असा एक क्षण कैद होतो, ज्याने नंतर सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Gold Chain Lost: स्वागताच्या मध्येच चैन गायब झाल्याचा दावा

मंत्र्यांना माळ घालताना आणि गर्दीच्या मध्येच नेत्याच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी गायब झाली आणि ते घाईगडबडीत तिथे उपस्थित लोकांशी व पोलिसांशी विचारपूस करताना दिसत आहेत. या साखळीची किंमत सुमारे ७ लाख रुपये होती असे सांगितले जात आहे. जरी व्हिडिओमध्ये साखळी चोरीला जाताना स्पष्टपणे दिसत नसली, तरी नेत्याची घाबरगुंडी स्पष्टपणे सांगत होती की त्यांच्यासाठी त्या चैनचे काय मूल्य होते. या घटनेनंतर झालेल्या चर्चा आणि पोस्टच्या माध्यमातून हा दावा समोर आला आहे. याच कारणामुळे व्हिडिओ पाहणारे लोकही विचारात पडले आहेत की, शेवटी एवढ्या गर्दीत साखळी कधी आणि कोणी पळवली असेल.

Gold Chain Lost: सोशल मीडियावर लोकांनी घेतली मजा

व्हिडिओवर युजर्सनी या घटनेबाबत मजेशीर शैलीत प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, "संधी साधून कोणीतरी यांची 'चैन' पळवली". तर दुसऱ्याने गमतीशीर अंदाजात म्हटले, "सोने घालून बाहेर पडाल तर हीच अवस्था होईल". एका युजरने नेत्याला टोमणा मारत लिहिले, "अहो भावा, कष्टाच्या कमाईची कशाशीच तुलना होऊ शकत नाही". तर एका कमेंटमध्ये म्हटले गेले, "कष्टाच्या कमाईपेक्षा चोराच्या कष्टाचीच जास्त चर्चा झाली".

Gold Chain Lost:  नेमकं काय घडलं?

मुझफ्फरपूर दौऱ्यावर असताना निशांत कुमार यांचा ताफा सकरी चौकात पोहोचला, तेव्हा तेथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक जमले होते. त्यांच्यापैकी अनेकजण मंत्र्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणि हार घेऊन पुढे सरसावले. मंत्र्यांना हार घालण्यासाठी पुढे जाणाऱ्यांमध्ये मंडल हेदेखील होते. आपली सोन्याची साखळी गायब झाली आहे, हे मंडल यांच्या लगेच लक्षात आले नाही. कार्यक्रम संपल्यानंतर लोक निघून जाऊ लागल्यावर त्यांनी मानेला हात लावला, तेव्हा त्यांना साखळी नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी त्यांनी घटनास्थळी उपस्थित पक्षाचे नेते आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

आपल्या लेखी तक्रारीत मंडल यांनी नमूद केले की, गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी साखळी ओढून घेतली असावी. तसेच, ढकला ढकली दरम्यान ती तुटून खाली पडली असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी, साखळी नेमकी कशी गायब झाली, याबद्दल निश्चित सांगता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तक्रारीत कोणत्याही आरोपीचे नाव नमूद करण्यात आले नसून, ती अज्ञात व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
Advertisement

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget