एक्स्प्लोर

जालना : शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळकेंच्या हत्या प्रकरणात भाऊच निघाला आरोपी

शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके हत्या प्रकरणात पोलिसांकडून सख्ख्या मोठ्या भावाला आणि त्याच्या एका मुलांला अटक.सुपारी देऊन हत्या केल्याचा संशय. आरोपी भाऊ रामप्रसादने सहआरोपी अर्जुन दंडाईतला सुपारी दिल्याचा संशय.

जालना : जिल्ह्यातील शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके यांच्या हत्या प्रकरणाचा उलघडा करण्यात जालना पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी सख्खा भाऊ आणि त्याच्या एका मुलाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मृत रमेश शेळके यांचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके आणि त्याची पत्नी दोन मुलांसह इतर एकूण 9 जणांविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अर्जुन दंडाईत नावाच्या आरोपीने कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदर आरोपीला मृताच्या भावाने सुपारी दिल्याचा देखील संशय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मृत रमेश शेळके यांचे आरोपी असलेला मोठा भाऊ रामप्रसाद शेळके याच्या विरोधात वडिलोपार्जित जमिनीचा वाद होता. हे प्रकरण 2018 पासून न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना दोन्ही भावांमध्ये खटके उडत होते. त्यामुळे पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि संशयावरून आरोपी ताब्यात घेतले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सध्या 9 पैकी 5 आरोपी पोलिसांच्या अटकेत असून इतर 4 आरोपी अजून फरार आहेत. दरम्यान मृत रमेश शेळके आणि त्याच्या मुलाला आज पोलिसांनी कोर्टासमोर हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रकरण असे आले उघडकीस? मृत शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके यांचे त्यांचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके यांच्या बरोबर वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीचा वाद होता, सदर प्रकरणात मृत रमेश शेळके यांनी कोर्टात दिवाणी दावा दाखल केला होता. याच जमिनीच्या वादातून एकमेकाविरोधात अनेकवेळा पोलीस स्टेशनपर्यंत तक्रारी झाल्या होत्या. हाच धागा आणि मृत रमेश शेळके यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी राम प्रसाद शेळके, त्याची पत्नी आणि दोन मुलांसह 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात शेवटचा कॉल डिटेल्स काढून शेजारी गाव असलेल्या ब्राम्हण खेडा येथील आरोपी अर्जुन दंडाईत याला ताब्यात घेतलं, त्याची उडवा उडवा उडवीची उत्तरे ऐकून पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सर्व प्रकरण पोलिसांसमोर सांगितले आणि हत्या आपणच केल्याचं कबूल केलं. सुपारीचा संशय मृत रमेश शेळके आणि त्यांच्या खुनात आरोपी असलेला मोठा भाऊ रामप्रसाद शेळके यांच्यात मध्यस्थ असलेला आणि हत्येची कबुली दिल्याचा आरोपी अर्जुन दंडाईत यांचे संबंध पाहता दोघांमध्ये रमेश शेळके यांना ठार मारण्याबाबत संगनमत झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. यात आरोपी रामप्रसाद शेळके यानेच या अर्जुन दंडाईतला सुपारी दिल्याचा अंदाज प्राथमिक तपासात समोर येतोय. कसा झाला खून? आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रमेश शेळके यांना 4 वाजता आरोपी अर्जुन दंडाईत याने मृत रमेश शेळके यांना एका ग्रामपंचायत सदस्याला आपल्याला घेऊन जायचे आहे. ज्यात आपल्याला पैसे मिळतील म्हणून फोन केला होता. दरम्यान यासाठी मृत रमेश शेळके यांनी टाळाटाळ केली. मात्र, ते आरोपीला भेटण्यास तयार झाले. दोघेजण मेहकर (जि. बुलढाणा) येथे गेले. रात्री येताना एका रस्त्यात ढाब्यावर त्यांनी जेवण केलं. त्यानंतर आरोपीने दारू पिली आणि मृत रमेश शेळके यांच्या गावाकडे जात असताना गाडीत, डोक्यात दगड घालून गळा आवळला. दरम्यान रमेश शेळके यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर त्याने पाथरूड नागापूर रोडवर मृत रमेश शेळके यांच्या गावापासून 6 किलोमीटर अंतरावर एका घाटात मृतदेह ड्रायव्हरच्या सीटवर बसवून मृताचे ओळखपत्र ओळख पटण्यासाठी बाहेर काढून जवळ असलेले डिझेल गाडीवर तसेच मृतदेहावर टाकले, यानंतर गाडी पेटवून ती दरी मध्ये लोटून दिली. दरम्यान आरोपीने दिलेल्या या माहितीवर पोलिसांची संपूर्ण खात्री नसून ते यात आणखी शोध घेत आहेत.

जालन्यातील नागपूर गावचे माजी सरपंच रमेश शेळकेंची हत्या, गाडीत जाळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget