एक्स्प्लोर

जालन्यात संतापजनक प्रकार! क्रीडा प्रबोधनीत चार विद्यार्थिनींचा विनयभंग, क्रीडा शिक्षकाला अटक

Jalna crime: याप्रकरणी क्रीडा शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जालना पोलीस अधिक तपास करत आहेत.

Jalna crime: बीडमध्ये कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीवर झालेलं अत्याचार प्रकरण ताजे असताना जालना शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील गांधी चमन परिसरात असलेल्या क्रीडा प्रबोधनीमध्ये कार्यरत असलेल्या क्रीडा शिक्षकावर चार विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा आरोप झाला आहे. या प्रकरणी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी क्रीडा शिक्षकाला अटक केली आहे.

प्रमोद खरात असं या संशयित आरोपी क्रीडा शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी काल रात्री संशयित आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहे. 

नेमकं काय घडलं?

गांधी चमन भागातील क्रीडा प्रबोधनीमध्ये नियमितरित्या क्रीडा प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या प्रशिक्षकाने म्हणजेच क्रीडा शिक्षक प्रमोद खरात याने वारंवार छळ केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलींनी संबंधित शिक्षण विभागाकडे तक्रार केली. याची गंभीर दखल घेत गटशिक्षण अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, पोलिसांकडून चौकशी सुरू 

या प्रकरणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह (Protection of Children from Sexual Offences Act) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला काल रात्री अटक केली. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत असून तपास सुरू आहे.

इतर विद्यार्थिनींवरही गैरवर्तनाची शक्यता?

ही केवळ चार विद्यार्थिनींची तक्रार नसून आणखी कोणी पीडित आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. क्रीडा प्रबोधनीमध्ये शिकणाऱ्या इतर विद्यार्थिनींशीही शिक्षकाने अशाच स्वरूपाचं वागणूक दिली आहे का, यासाठी पोलीस सर्व विद्यार्थिनींचे जबाब नोंदवत आहेत. तसेच, घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि बालकल्याण समितीनेही भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.

शहरात संतापाची लाट, शिक्षण विभाग सतर्क

या घटनेमुळे जालना शहरात संतापाची लाट उसळली आहे. पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. जालना क्रीडा प्रबोधिनी शिक्षण विभागानेही घटनेची गंभीर दखल घेत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime News: ट्रेनमध्ये छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात बांगड्या भरल्या, ओठांवर लिपस्टिक लावली; अकोला-बडनेरा रेल्वेत काय घडलं?
ट्रेनमध्ये छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात बांगड्या भरल्या, ओठांवर लिपस्टिक लावली; अकोला-बडनेरा रेल्वेत काय घडलं?
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
जामिनावर सुटलेल्या पेंद्या भाईला लग्नाआधीच संपवलं, मैत्रिणीवरही जीवघेणा हल्ला, धक्कादायक घटनेनं कल्याण हादरलं
जामिनावर सुटलेल्या पेंद्या भाईला लग्नाआधीच संपवलं, मैत्रिणीवरही जीवघेणा हल्ला, धक्कादायक घटनेनं कल्याण हादरलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
Embed widget