Jalgaon Crime News : जुन्या वादातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये जेवत असलेल्या तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना जळगाव शहरात (Jalgaon News) घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेतील चार जणांना पोलिसांनी (Police) अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कालिका माता मंदिर (kalika Mata Mandir) परिसरात असलेल्या हॉटेल भानू येथे रात्रीच्या वेळी किशोर सोनवणे (Kishor Sonawane) हा तरुण काही मित्रांच्या समवेत जेवण करत होता. यावेळी हातात काठ्या घेऊन सात ते आठ तरुण हॉटेलमध्ये शिरले. 


जुन्या वादातून तरुणाची हत्या, चार जण गजाआड  


त्यानंतर टोळक्याने किशोर सोनवणेवर हल्ला केला. यामुळे किशोर सोनवणे जागीच मृत्यू झाला. मृत्यू होऊनही टोळक्याने त्याला मारहाण सुरूच ठेवल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. या घटनेतील आरोपी विरोधात शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


बापलेक पोहत होते, तेवढ्या फोन आला, वडील फोनवर बोलण्यासाठी निघून गेले, पण जेव्हा परतले तोपर्यंत नियतीन डाव साधलेला!


Pune Accident : पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, बालसुधारगृहात रहावे लागणार; बाल न्याय मंडळाचा मोठा निर्णय