Delhi Crime News : नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi News) घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. दिल्लीतील (Delhi Crime News Updates) अलीपूर परिसरात 11 वर्षांच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. मृत मुलगा आपल्या वडिलांसोबत स्विमिंग पुलमध्ये पोहायला गेला होता. तेवढ्यात त्याच्या वडिलांना एक फोन आला. फोनवर बोलण्यासाठी ते स्विमिंग पुलमधून बाहेर पडले आणि परतले त्यावेळी त्यांना त्यांचा मुलगा स्विमिंग पुलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. या घटनेनं पुरती खळबळ उडाली आहे. याप्रकरणात, मृत मुलाच्या कुटुंबियांनी घातपाताचा आरोप करत संशय व्यक्त केला आहे. 


दिल्लीतील अलीपूर भागात एका 11 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. हा जलतरण तलाव दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. मृत मुलाच्या कुटुंबीयांनी बुधवारी अलिपूर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं करत या घटनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. उत्तर दिल्लीतील अलीपूर भागात दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींनी चालवलेल्या स्विमिंग पूलमध्ये एका 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं बुधवारी दिली. या घटनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं केली होती. 


वडिल फोनवर बोलण्यासाठी स्विमिंग पुलमधून बाहेर पडले, परतल्यानंतर पाहिलं तर... 


एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात कोणताही गैरप्रकार झाल्याचं दिसून आलेलं नाही, परंतु तपास सुरू आहे. डीसीपी रवी सिंह यांनी सांगितलं की, कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी हा मुलगा, त्याचे वडील आणि इतर काही मुलं तलावात पोहत असताना ही घटना घडली.


"फोनवर बोलून मी परतलो, त्यावेळी माझा मुला बेशुद्ध अवस्थेत आढळून आला"


मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, "मी आणि माझा मुलगा स्विमिंग पुलमध्ये पोहोत होतो. त्याचवेळी मला एक फोन आला. फोन घेण्यासाठी मी स्विमिंग पुलमधून बाहेर आलो. फोनवर बोलून झाल्यानंतर परतलो, त्यावेळी माझा मुलगा बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. त्याला तात्काळ मी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं." 


कुटुंबियांकडून संशय व्यक्त 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या कुटुंबियांनी अलीपूर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं. त्यांचं म्हणणं आहे की, हा घातपात असू शकतो. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप तपासात कोणतीही गडबड आढळून आलेली नाही. परंतु, ज्या स्विमिंग पुलमध्ये हा प्रकार घडला. तो स्विमिंग पुल अनधिकृत पद्धतीनं चालवला जात होता.