जळगाव : बहिणीकडे जेवणासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी (Robbery) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक तोडून 1 लाख 60 हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 14 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना बळीराम पेठेतील एजीएम प्लाझामध्ये (Jalgaon Crime News) घडली. याप्रकरणी शहर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या गुन्हाचा छडा लावण्याचे आव्हान पोलीस दलापुढे आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बळीराम पेठेतील (Baliram Peth) ए.जी.एम. प्लाझा अपार्टमेंटमध्ये मुजाईद खान अय्यूब खान (Mujaid Khan Ayyub Khan) हे वास्तव्यास आहे. ते उस्मानिया पार्कमध्ये त्यांच्या बहिणीकडे गेले होते. रात्री पावसाचे वातावरण असल्याने ते तिथेच मुक्कामी थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या आई वडिलांना बाहेरगावी जायचे असल्याने मुजाहिद यांची बहीण ही घरी आली होती. मात्र, त्यानंतर ती घराला कुलूप लावून पुन्हा मोठ्या बहिणीकडे निघून गेली. 


भरदिवसा घरफोडी 


त्यानंतर दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ अबुबकार खान हा घरी आला असताना त्याला घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसून आले नाही, तसेच घराचा दरवाजाही उघडाच होता. त्याने घरात जाऊन पाहणी केली असता, त्याला घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने त्याने घडलेली घटना मुजाहिद याला सांगितली. 


अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल


घटनेची माहिती मिळताच त्याने तत्काळ घराकडे धाव घेतली. यावेळी त्याला घरातील लोखंडी कपाटाचे लॉक हे वाकलेले दिसून आले. तसेच त्यातील सोन्याचे दागिने, मोबाइल दिसून न आल्याने घरात चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी त्वरित शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.


4 लाख 14 हजारांचा ऐवज चोरीला 


चोरट्याने मुजाहिद यांच्या घरातून 1 लाख 60 हजारांची रोकड, 25 ग्रॅम वजानाचा सोन्याचा हार, 10 ग्रॅमचे सोन्याचे कर्णफुले, 15 ग्रॅम पोत, 10 ते 15 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या आणि मोबाइल असा एकूण 4 लाख 14 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. 


इतर महत्वाच्या बातम्या


CM Eknath Shinde : जनतेला काम करणारा मुख्यमंत्री हवा, घरी बसणारा नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं


Chhattisgarh News : 10 लाखांचं बक्षीस असणारा नक्षलवादी ठार, छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद