International Drug Smuggling Gang in Delhi : दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकानं अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकानं शुक्रवारी मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे. क्राईम ब्रांचने आंततराष्ट्रीय ड्रग तस्करांचा भांडोफोड केला आहे. अफगाणिस्तान येथून भारतातील पंजाब, दिल्ली यांसारख्या इतर राज्यांमध्ये हेरॉईन तस्करी सुरु होती. पोलिसांनी या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत एका अफगाणी नागरिकासह चार जणांना अटक केली आहे.


दिल्ली पोलिसांच्या पथकानं ड्रग तस्करांवर कारवाई करत सुमारे 21.400 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. आंतररष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या हिरोईनची किंमत सुमारे 130 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या रॅकेटमध्ये सुमारे 250 तस्करांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.


गुप्त माहिती मिळाल्यावनंतर पोलिसांची कारवाई


दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं की, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नसीम बरकाजीला कर्करडूमा येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं. चौकशीदरम्यान नसीमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागात छापेमारी करताना 7.4 किलो हेरॉईन जप्त केलं.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा अफगाणिस्तान (अफगाणिस्तान) संबंध आणि या रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी महावीर नगर आणि डाबरी परिसरात छापा टाकून आणखी एकाला अटक केली आणि 11 किलो हेरॉईन जप्त केलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


देशातील अनेक राज्यांशी रॅकेटचा संबंध


अटक करण्यात आलेल्या आणखी एका आरोपीवर यापूर्वीच नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटची मुळं दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीरसह जागतिक स्तरावर आहेत.