एक्स्प्लोर

बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा

नोएडामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. इन्स्टाग्राम रील्स पाहून बनावट नोटा बनवल्या 100 रुपयांच्या नोटा बनलल्या जात होत्या

Instagram Reels News : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. इन्स्टाग्राम रील्स पाहून बनावट नोटा बनवल्या 100 रुपयांच्या नोटा बनलल्या जात होत्या. ग्रेटर नोएडा येथील इकोटेक 1 पोलीस स्टेशन आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) च्या पथकाने बनावट नोटांची छपाई आणि तस्करी करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून प्रत्येकी 100 रुपयांच्या एकूण 2549  बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या नोटांचे एकूण मूल्य अंदाजे 254900 रुपये आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींकडून बनावट नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर, नोटा कापण्याचे मशीन, एक स्कॉर्पिओ कार, चार मोबाईल फोन, ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. सोमवारी रात्री, पोलीस आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) सिरसा चौकात तपासणी करत असताना त्यांनी एका स्कॉर्पिओ कारमधील तीन संशयितांना पकडले.

त्यावर छापलेला एकच अनुक्रमांक

झडतीदरम्यान बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या सर्व बनावट नोटांवर एकच अनुक्रमांक होता. आरोपी या नोटा बाजारात चलनात आणण्यासाठी आणि विकण्यासाठी त्यांची वाहतूक करत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बंटी अत्री, खुशदिल आणि उपेंद्र कुमार अशी आहेत. हे तिन्ही आरोपी अलीगढ जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांचे रहिवासी आहेत.

बंडलच्या वर आणि खाली खऱ्या नोटा

एडीसीपी अभय मिश्रा यांनी सांगितले की, आरोपींनी आधी खऱ्या नोटा स्कॅन केल्या. त्यानंतर, प्रिंटरचा वापर करून त्यांनी त्याच अनुक्रमांकाच्या बनावट नोटा तयार केल्या. नोटांना आकार देण्यासाठी कटिंग मशीनचा वापर करण्यात आला. आरोपींनी बनावट नोटांचे बंडल तयार केले आणि बंडलच्या वर व खाली खऱ्या नोटा ठेवल्या. याव्यतिरिक्त, बंडल खरा वाटावा यासाठी, कॅनरा बँकेचे डिपॉझिट फॉर्म रबर बँडने दोन्ही टोकांना बांधले होते.

या व्यक्तींनी इन्स्टाग्राम रील्स पाहून या बनावट नोटा बनवायला शिकले होते आणि ते सुमारे तीन महिन्यांपासून याचा सराव करत होते. 100 रुपयांची नोट बनवण्याचा खर्च अंदाजे 15 रुपये होता. त्यांनी बनावट नोटा वापरून अनेक लोकांची फसवणूक केली होती.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी 29 ऑक्टोबरला ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Pradeep Purnekar and Rajendra Shinde: प्रदीप पूर्णेकर मृत्यूप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा, मुलाने राजेंद्र शिंदेंचा मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ दाखवला, म्हणाला...
प्रदीप पूर्णेकर मृत्यूप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा, मुलाने राजेंद्र शिंदेंचा मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ दाखवला, म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी 29 ऑक्टोबरला ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Embed widget