Attack In Delhi On Woman : राजस्थानमधील (Rajasthan) अशोक गहलोत (Ashok Gehlot) सरकारमधील मंत्री महेश जोशी (Mahesh Joshi) यांच्या मुलाविरोधात बलत्काराची तक्रार दाखल करणाऱ्या तरुणावर हल्ला झाल्याचं समोर आले आहे. घटनेनंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला सोडण्यात आले. याबाबत शाहीन बाग पोलिस स्टेशनकडून तरुणीवर केमिकल नव्हे शाही फेकल्याचं सांगण्यात आलेय. 


शनिवारी रात्री दिल्लीतील शाहीन बाग स्टेशन परिसरात रिक्षात आलेल्या दोन तरुणांनी माझ्यावर केमिकल फेकले आणि पसार झाले, असा आरोप पीडित तरुणाने केलाय. 


आईसोबत कालिंदी कुंज रोड परिसरात होती पीडिता - 
शाहीन बाग पोलिस स्थानकातील अधिकाऱ्याने सांगितले की, तरुणांनी मुलीच्या अंगावर काहीतरी फेकलं अन् पसार झाले, असा कॉल शनिवारी आम्हाला पीसीआरवर आला. याबाबत पीडितेनं जबाब दिला, त्यामध्ये ती म्हणाला की, आईसोबत कालिंदी कुंज रोड परिसरात चालत होती. त्यावर अचानक दोन तरुणांनी माझ्या अंगावर काहीतरी फेकलं अन् पसार झाले.  एम्सच्या ट्रॉमा सेंटरवर त्याबाबत तपास झाला.. त्यातून हा पदार्थ निळ्या शाईसारखा दिसत होता. या सर्व प्रकरणानंत शाहीन बाग पोलीस स्टेशनमध्ये कलम 195ए/506/323/34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  


मंत्र्याच्या मुलाला वाचवण्यापेक्षा अटक करावी, स्वाती मालीवाल 
या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या (DWC) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत आपला रोष व्यक्त केला. त्यामध्ये त्या म्हणतात की, ''ज्या मुलीने राजस्थानमधील मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशीवर बलात्काराचा आरोप लावलाय. त्या मुलीच्या चेहऱ्यावर दोन अज्ञात लोकांनी पदार्थ फेकला. अशोक गहलोत जी, मंत्र्याच्या मुलाला वाचवण्यापेक्षा त्याला अटक करा. या हल्ल्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवत आहे..''






इतर महत्त्वाच्या बातम्या