Mushroom Benefits : भारतातील अनेक भागात मशरूमचे विविध प्रकार आढळतात. मशरूमला ‘अळंबी’ नावाने देखील ओळखले जाते. आजकाल बाजारात मशरूम सहज उपलब्ध होतात. ही एक अशी भाजी आहे, जी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. मशरूम चवीला देखील उत्तम लागतात. भारतीय बाजारातपेठेत मशरूमच्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या लोकांना मशरूम खूप आवडतात. मशरूम केवळ चवीलाच अप्रतिम नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.


मशरूममध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो अॅसिड आढळतात. यामुळेच मशरूमला आरोग्याच्या दृष्टीने रामबाण औषध मानले जाते. चवीष्ट असल्याने अनेकांना मशरूम खायला आवडते. पण, अनेकांना त्याचे फायदे माहीत नसतात. आज आम्ही तुम्हाला मशरूम खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया...


अनेक आजारांना ठेवते दूर : मशरूमच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. मशरूमला नैसर्गिक अँटीबायोटीक मानले जाते. याच्या सेवनाने मायक्रोबियल आणि इतर फंगल इन्फेक्शन देखील बरे होते. यामध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील पेशींची दुरुस्ती करतात.


हृदयाची निरोगी राहते : मशरूमच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते. मशरूममध्ये हाय न्यूट्रियंट्स आणि अनेक प्रकारचे एन्झाइम्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.


मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर : मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मशरूम खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये साखर अजिबात नसते. मशरूमच्या सेवनाने शरीरात इन्सुलिनची पातळी संतुलित राखण्यास मदत होते.


पोटाच्या समस्यांपासून मिळतो आराम : मशरूमच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी पोटाच्या समस्या दूर होतात. फॉलिक अॅसिडमुळे ते शरीरात रक्त बनवण्याचेही काम करते.


हाडं मजबूत होतात : मशरूमच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. त्यात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन डीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.


अँटी-एजिंग : मशरूम त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. याच्या सेवनाने त्वचा दीर्घकाळ तरुण राहते. त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत


महत्वाच्या बातम्या :