मुंबई : प्रेमासाठी काही पण, असं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल आणि काही प्रमाणात पाहिलंही असेल. पण अशीच काहीशी एक विचित्र घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडसाठी एक तरुण चक्क ISI एजंट बनला. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण आयएसआय एजंट बनून सोशल मीडिया द्वारे गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवत होता, असं सांगितलं जात आहे. सीआयडीने मिळालेल्या माहितीवरुन सापळा रचत या तरुणाला अटक केली आहे. बिहारमधील मुजफ्फरपूरमधील ही घटना उघडकीस आली आहे.


प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी बनला ISI एजंट


बिहारमधील तरुण हनी ट्रॅपमध्ये फसून आयएसआय एजंट (ISI Agent) बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीआयडीने बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका पाकिस्तानी गुप्तहेरला भरूचमधून अटक केली आहे. आर्मी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुजरात पोलिस, सीआयडी आणि मुझफ्फरपूर पोलिसांचे पथक जिल्ह्यात छापेमारी करत आहेत.


पाकिस्तानी गुप्तहेराला अटक


सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला गुप्तहेर प्रवीण मिश्रा याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत प्रवीण मिश्रा त्याच्या प्रेयसीला सोशल मीडियावर इंप्रेस करण्यासाठी ISI एजंट बनल्याचं समोर आलं आहे. फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करून पाकिस्तानच्या गुप्तचर एजंटने त्याला हनीट्रॅपमध्ये फसवल्याचं तपासात समोर आलं आहे.


पाकिस्तानमधील ISIS एजंटना गुप्त माहिती पुरवली


लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या एमआय उदमपूर युनिटला पाकिस्तानी गुप्तहेरांबाबत सुत्रांकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीआयडीने भरूच येथून प्रवीण मिश्रा नावाच्या तरुणाला अटक केली. सीआयडी क्राईमचे एडीजीपी राजकुमार पांडियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी भारतातून पाकिस्तानमधील ISIS एजंटना गुप्त माहिती पाठवत होता.


मोबाईल जप्त, व्हॉट्सॲप चॅट्समध्ये संवेदनशील माहिती 


सीआयडीने गुप्तहेर प्रवीण मिश्राला अटक केली असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलद्वारे प्रवीण सोशल मीडियाचा वापर करुन पाकिस्तानमधील ISIS एजंटना माहिती पुरवता असल्याचं समोर आलं आहे. या मोबाईल फोनमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटसोबत व्हॉट्सॲप चॅट्स आणि ऑडिओ कॉल्ससह अत्यंत संवेदनशील माहिती सापडली आहे.


नेमकं प्रकरण काय?


आयएसआय एजंटने सोनल गर्ग या नावाने सोशल मीडियावर फेक प्रोफाईल बनवलं होतं. सोनल गर्ग या एजंटने प्रवीण मिश्रा या तरुणाला हनीट्रॅपमध्ये फसवलं. मेसेजिंगच्या माध्यमातून त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर व्हॉट्सॲप नंबरची देवाणघेवाण झाली. यानंतर आयएसआय एजंटने सोनल गर्गने प्रवीणला आयएसआय एजंट होण्यासाठी प्रवृत्त केलं आणि गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी प्रवीण ISI एजंट बनवून पाकिस्तानला माहिती पुरवू लागला. प्रवीण हा मूळचा बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवाली आहे. तो गुजरातमधील अंकलेश्वर जीआयडीसीमध्ये इंजिनियर पदावर कार्यरत होता, तेथून त्याला अटक करण्यात आली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : सूर्यटोला जळीतकांडातील आरोपी किशोर शेंडेंला फाशी; सासरा, पत्नी आणि मुलाला जिवंत जाळलं