Hingoli Crime News : हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका तरुणाने 19 वर्षीय तरुणीच्या पोटात चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल (20 फेब्रुवारीच्या) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. गोरेगाव येथील रहिवासी असलेला आरोपी अभिषेक खिल्लारी या तरुणाने संजना खिल्लारी या 19 वर्षीय तरुणीच्या घरात जात तू माझी जिंदगी बरबाद केली असल्याचे म्हणत आरोपीने संजनाच्या पोटात चाकूने वार करत ही हत्या केली आहे.
या प्रकरणी आरोपी अभिषेक खिल्लारी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा देखील गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीने तरुणीचा खून का केला, हे अद्याप स्पष्ट झालं नसून गोरेगाव पोलीस खुनाचा तपास करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनैतिक संबंधाच्या कारणातून सेंट्रिंग कामगाराचा खुन, तिघेही अल्पवयीन ताब्यात
सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर काल (20 फेब्रुवारी) दुपारी झालेला खून हा तीन अल्पवयीन मुलांनी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामुळे अल्पवयीन मुलाकडून खुनाच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. काल दुपारी अनैतिक संबंधाच्या रागातून सेंट्रिंग कामगार दत्ता शरणाप्पा सुतार याचा तिघा अल्पवयीन युवकांनी एडक्याने वार करून निघृण खून केला. सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर हा प्रकार घडला. सांगली शहर पोलिसांनी अवघ्या दोन-तीन तासांत खुनाचा छडा लावला. तिघांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत एकाने त्याच्या आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध होते. त्या रागातून दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. पोलिस तपासात तिघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. आज या तिघांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
अज्ञाताकडून कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग, 50 कबुतरांचा जळून दुर्देवी मृत्यू
अकोल्यात एका विकृत व्यक्तीने कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग लावलीये. या आगीत जवळपास 50 कबुतरांचा जळून दुर्देवी मृत्यू झालाय. अकोल्यातल्या नायगाव परिसरात ही घटना घडलीय. रहमत खान यांचे कुटुंबिय कबुतर पाळतात. त्यांच्याकडं विविध रंगांची, विविध जातीची कबुतरे होती. घराच्या गच्चीवर एका खोलीत लाकडी पिंजऱ्यांमध्ये अनेक कबुतरे पाळण्यात आली होती. याच ठिकाणी असलेल्या लाकडीला पिंजऱ्याला अज्ञात विकृत व्यक्तीने पेट्रोल टाकत आग लावलीय. या आगीत जळून 50 कबुतरांचा मृत्यू झालाय. या प्रकरणात रहमत खान यांनी अकोटफैल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरुये.
गच्चीवर खोलीतील लाकडी पिंजऱ्यावर पेट्रोल ओतून आतील कबुतर पूर्णतः जाळलेयेत. दरम्यान, रहमत खान यांचे कबुतर नायगाव परिसरात खूप लोकप्रिय होतेय. त्यांच्या गच्चीवर कबुतर पाहण्यासाठी अनेज लोक येत होतेय. अज्ञात व्यक्तीने कबुतरांना कशासाठी जिवंत जाळलं? हाच प्रश्न कुटुंबीयांना पडलाय.
हे ही वाचा