Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) आयुष्यावर आधारित छावा चित्रपट (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर सध्या तुफान गाजत आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकीपीडियावर असलेल्या वादग्रस्त मजकूरावरून वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील घेतली आहे. आता छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान विकीपीडियाला (Wikipedia) चांगलाच महागात पडणार आहे.  महाराष्ट्र सायबर सेल (Maharashtra Cyber ​​Cell) वादग्रस्त लिखाण टाकणाऱ्या लेखकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.  

Continues below advertisement

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकीपीडियावर वादग्रस्त व चुकीची माहिती देण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींचे मने दुखावली गेली असून तो वादग्रस्त मजकूर विकीपीडियावरून काढून टाकण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. विकीपीडियाला माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते, मात्र त्यांनीच अशी चुकीची माहिती दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे. तर अभिनेता कमाल खानने (Kamal Khan) देखील छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा चुकीचा मजकूर शेअर केला. हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा अभिनेता कमाल खानने केल्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकीपीडियावरील मजकूर हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.     

छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान विकीपीडियाला महागात पडणार

विकिपीडियाला छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतचा वादग्रस्त कंटेंट हटवण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र विकिपीडियाकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आता विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण टाकणाऱ्या लेखकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण होईल, असे लिखाण विकिपीडियावर अपलोड केल्याने हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते. विकिपीडिया हा एक ओपन फ्लॅटफॉर्म आहे. तिथे काही ठराविक लोकांना स्वत:चे लिखाण अपलोड करण्याची मुभा आहे. महाराष्ट्र सायबर सेल विकिपीडियावर असलेल्या कंटेंटसंदर्भात चार ते पाच लोकांवर गुन्हा दाखल केल्याचे माहिती समोर येत आहे. त्यामुळे विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण करणारे चांगलेच अडचणीत येणार असल्याचे दिसून येत आहे. 

Continues below advertisement

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Chhaava Box Office: 'छावा'च्या आसपास शाहरुख-सलमानही नाही; विक्की कौशलसमोर 2000 कोटींच्या अभिनेत्यानंही टेकले गुडघे

विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, ज्याला जे वाटतं ते टाकतोय; सरकारने कारवाई केली, पण पुरेसी नाही : शाहू महाराज