Crime News Updates: नवी दिल्ली : लग्न झालेलं असूनही दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम जडलं म्हणून आपलं घर-दार सोडून पळून गेलेल्या अनेक घटना आपण पाहतो, ऐकतो. पण हरियाणात (Haryana) घडलेली एक घटना ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. एका व्यक्तीनं आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून चक्क सख्ख्या मेहुणीसोबतच वेगळा संसार थाटण्याचा घाट घातला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या मेव्हणीला घेऊन हा चार मुलं असलेला पठ्ठ्या पळाला, त्या मेहुणीलाही पाच मुलं असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कुटुंबीयानं मिळताच दोन्ही कुटुंबांनी पोलिसांत धाव घेत, तक्रार दाखल केली आहे. 


हरियाणाच्या कर्नालमध्ये (Karnal News) घडलेल्या या घटनेनं अनेकांना हैराण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलीम हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील फारुखाबादचा रहिवासी आहे. सलीम त्याची मेहुणी असल्याचे भासवणाऱ्या आपल्या भावाच्या पत्नीसह पळून गेला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. मेहुणीला 5 मुलं असून आरोपी तरुणाला 4 मुलं आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, मेहुणीला घेऊन पसार झालेल्या तरुणाची पत्नी पाचव्यांदा गरोदर आहे. 


चार मुलांचा बाप, पाच मुलं असलेल्या मेहुणीला घेऊन पसार 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आरोपीची पत्नी पाचव्यांदा गरोदर राहिली, तेव्हा आरोपी त्याच्या मेहुणीला पत्नीला सांभाळण्यासाठी, तिची काळजी घेण्यासाठी घरी घेऊन आला. त्यानंतर त्याच मेहुणीला घेऊन पसार झाला. मेहुणा आणि मेहुणी फरार झाल्याचं तब्बल पाच दिवसांनी कुटुंबीयांच्या लक्षात आलं. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ स्थानिक पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. 


आरोपीची पत्नी पाचव्यांदा गरोदर 


पीडित कुटुंबानं पोलिसांत तक्रार दाखल करताना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा उत्तर प्रदेशातील फरुखाबादचा राहणारा आहे. कर्नालच्या घरोंड्यातील एका गावात आरोपी आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याला चार मुलं असून त्याची पत्नी आता पाचव्यांदा गरोदर आहे. पत्नीची काळजी घेण्यासाठी आरोपी मेहुणीला आणायला तिच्या घरी गेला. तिनं वारंवार बहिणीकडे जाण्यासाठी विरोध केला, मात्र कुटुंबीयांनी जबरदस्तीनं तिला आरोपीसोबत बहिणीची काळजी घेण्यासाठी पाठवलं. मेहुणा आणि मेहुणीचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, याबाबत कुटुंबीयांना काहीच कल्पना नव्हती. 


पोलिसांत तक्रार दाखल, दोघांचाही तपास सुरू 


आता 6 ते 7 दिवस झाले असून पसार झालेल्या आरोपी आणि महिलेबाबत कोणतीच माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पोलिसांसोबतच कुटुंबीयही दोघांचा शोध घेत आहेत. तसेच, पोलिसांचं म्हणणं आहे की, लवकरच दोघांनाही पकडलं जाईल, असा दावा वारंवार पोलिसांकडून केला जात आहे.