नाशिक : धार्मिक भक्ती आणि श्रद्धेतून देवाच्या दरबारात माथा टेकण्यासाठी कोट्यवधी भाविक दररोज जात असतात. त्यातच, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी देखील भाविकांची तीर्थक्षेत्रस्थळी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, शिर्डी साईबाबा, नाशिक (Nashik) त्र्यंबकेश्वरसह राज्यातील अनेक मंदिरात भाविकांना मोठ्या संख्येनं दान केलं. कुणी रोकड स्वरुपात, कुणी सोनं-चांदीच्या दागिने स्वरुपात, कुणी ऑनलाईन पद्धतीने दान देऊन देवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिरास काही दिवसांपूर्वी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय असलेल्या मनोज मोदी यांनी भेट दिली होती. त्यावेळी, त्र्यंबकेश्वर मंदिरातील सोन्याचा मुकुट बनविण्यासाठी सोनं (Gold) देण्याचं त्यांनी म्हटलं होतं. 


मनोज मोदी यांनी भेट दिल्यानंतर म्हटल्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर देवस्थानला सव्वा किलोचे सोने दान केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी मागील महिन्यात दर्शनासाठी आले होते, त्यावेळी देवस्थानच्या विश्वस्तांनी 200 वर्षांपूर्वीचा सुवर्ण मुकुट नव्याने बनविण्याचा संकल्प त्यांना सांगितला होता. देशभरातील भक्तांच्या सुवर्ण दानातून साडेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनविला जाणार आहे, त्यापैकी पाच किलोहून अधिक सोने देवस्थानला दानाच्या स्वरूपात प्राप्त झाले आहेत. आता, उर्वरित सोने अर्पण करण्याचे मनोज मोदी यांनी म्हटले होते. त्यानुसार, मोदी यांचे सहकारी हितेश यांनी आज सपत्नीक येऊन सव्वा किलो सोने म्हणजेच 125 तोळे सोने, ज्याची बाजार भावाप्रमाणे किंमत अंदाजे 1 कोटी रुपये आहे, तेवढं सोनं अर्पण करण्यात आलं आहे. 


कोण आहेत मनोज मोदी


मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन असून उद्योगपती मुकेश अंबानी यांचे खास आहेत. अंबानी आणि मोदी हे कॉलेजपासूनचे मित्र असून ते 55 वर्षांचे आहेत. मूळ गुजराती कुटुंबातील असलेल्या मोदींनाच मुकेश अंबानी यांनी 1500 कोटी रुपयांचं 22 मजल्यांचं अलिशान घर गिफ्ट दिलं होतं. मोदी ह्यांनी 1980 साली रिलायन्स इंडस्ट्रीसोबत कामाला सुरुवात केली होती. तेव्हापासून ते रिलायन्स उद्योग समुहाशी जोडलेले असल्याने अत्यंत विश्वासू आणि कौटुंबिक सदस्य मानले जातात.   


हेही वाचा


मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च