Gondia News गोंदिया: नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून सुरू केलेला 112 हा क्रमांक राज्यात कार्यान्वित झाला आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून आजवर आपण एखादा गुन्हा घडत असेल किंवा पोलिसांची मदत हवी असल्यास आपण आपात्कालीन फोन क्रमांक डायल करून मदत मागतो. मात्र याच क्रमांकाच्या मदतीने प्रतिबंधित तंबाखूची (Tobacco) वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे. गोंदियातील (Gondiya) एका व्यापाऱ्याला काही अज्ञात व्यक्ती आपल्या चारचाकी वाहनातून काहीतरी संशयीतरित्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर या बाबतची माहिती व्यापाऱ्याने 112 वर संपर्क करून पोलिसांना (Gondia Crime News) दिली असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून कारवाई केली. ज्यामध्ये सुमारे 5 लाख 57 हजारांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधीत तंबाखु जप्त करण्यात आला आहे.


वेगवेगळ्या 16 उत्पादकांचे तंबाखूजन्य पदार्थ


राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावर बंदी आहे. मात्र नव-नवी शक्कल लावून छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक होत असते. आशा छुप्या कारवाईवर पोलिसांकडून बारीक नजर ठेवली जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेश राज्यात तंबाखूजन्य पदार्थावर बंदी नसल्याने गोंदियातील काही व्यापारी बालाघाट जिल्ह्यातून गुटख्याची तस्करी करून जास्त दराने गोंदियात विक्री करतात. म्हणून शहरात मोठ्याप्रमाणात प्रतिबंधित तंबाखूची छुप्या मार्गाने वाहतूक केली जाते. अशीच एक तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक काही अज्ञात व्यक्ती करत असल्याचा संशय एका व्यापाऱ्याला आला.


त्याने तत्काळ  याबाबत माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या वाहनांची अडवणूक करून झडती घेतली असता, या वाहनात वेगवेगळ्या 16 उत्पादकांचे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले आहे. या प्रकरणी एक मालवाहक गाडी पोलिसांनी जप्त केली असून 3 संशयित आरोपींना तपासाकरिता ताब्यात घेतले आहे. रामनगर पोलिसांत अन्न सुरक्षा मानक देय कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.


557 किलो वजनाचा प्रतिबंधित तंबाखू जप्त 


काही व्यक्ती आपल्या वाहनातून प्रतिबंधित तंबाखूची वाहतुक करत असल्याची माहिती आम्हाला रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला फोनवरून दिली. त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तपासणी केली असता या वाहनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या 16 उत्पादकांचे तंबाखू, सुगंधित गुटखा आणि पान मसाला आढळून आला. त्यानंतर अन्नसुरक्षा मालकी कायदा 2006 अंतर्गत हा संपूर्ण माल जप्त केलेले आहे.


जप्त कारण्यात आलेला हा संपूर्ण मालाची किंमत आहे  5 लाख 57 हजार 139 रुपये इतकी असून 557 किलो वजनाचा हा साठा आपल्याला आढळून आलेला आहे. या प्रकरणात  सध्या तीन 3 संशयित आरोपींना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यामध्ये वाहन चालक आणि इतर दोन साथीदारांचा समावेश आहे. पुरवठादाराचा तपास व्हावा म्हणूनच आपण तक्रार नोंदवली आहे. याचा संदर्भात अधिक तपास गोंदिया पोलीस करत असल्याची माहिती गोंदिया जिल्ह्याच्या अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी देशपांडे यांनी दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या