IND vs ENG 2nd Test 1stDay : टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची हाराकिरी दुसऱ्या कसोटीतही सुरुच राहिली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या 6 विकेटवर 336 पर्यंत पोहोचली. विशाखापट्टणम कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नावावर राहिला. यशस्वी जैस्वालने 257 चेंडूत 179 धावा करून नाबाद आहे. त्याने आपल्या खेळीत 17 चौकार आणि 5 षटकार मारले. शोएब बशीर आणि रेहान अहमद यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. याशिवाय जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टले यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जैस्वाल आणि रवी अश्विन नाबाद परतले. 






पहिला दिवस यशस्वी जैस्वालच्या नावावर  


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. पण यशस्वी जैस्वाल एका बाजूने डाव सांभाळला. भारतीय संघाला पहिला धक्का 40 धावांवर बसला. कर्णधार रोहित शर्मा 14 धावा करून बाहेर पडला. यानंतर शुबमन गिल 34 धावा करून जेम्स अँडरसनचा बळी ठरला. तर श्रेयस अय्यरने 27 धावा केल्या. श्रेयस अय्यरला टॉम हार्टलेने बाद केले. रजत पाटीदार 32 धावा करून रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला.






टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतले


भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, परंतु टीम इंडियाचे फलंदाज चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरले. टीम इंडियाचा अष्टपैलू अक्सर पटेल  27 धावा करून बाद झाला. शोएब बसीरने त्याला बाद केले. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत 17 धावा करून रेहान अहमदच्या चेंडूवर बाद झाला. 




इतर महत्वाच्या बातम्या