गोंदिया : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणाने मुलीच्या दोन नातेवाईकांवर चाकूने हल्ला केला. तर या हल्ल्याला उत्तर देताना आरोपीसोबत आलेल्या तरुणावर मुलीच्या नातेवाईकांनी चाकूने हल्ला केला. गोंदिया जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचाराकरता नागपूरला हलवण्यात आलं आहे. तर एकावर गोंदियात उपचार सुरु आहेत. रविवारी (24 एप्रिल) रात्री ही घटना घडली.
गोंदिया शहरात आरोपी 17 वर्षीय तरुणाने 12 वर्षीय मुलीला प्रपोज केलं होतं. पण ती मुलगी आपल्यासोबत बोलत नाही म्हणून आरोपी तरुणाने मुलीच्या घरी जाऊन आईसमोरच तिला चाकूने मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलीच्या आईने या संदर्भात आपल्या नातेवाईकांची मदत मागितली. परंतु आरोपीने मुलीच्या तीन नातेवाईकांपैकी दोघांवर चाकूने वार करत हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मुलीच्या नातेवाईकाने देखील आरोपी मुलासोबत आलेल्या तरुणावर चाकूने वार केला. या घटनेत मुलीच्या नातेवाईकांपैकी दोन तर मुलासोबत आलेला एक जण असे तिघे जखमी झाले आहेत. या पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवलं आहे. तर एकावर गोंदियात उपचार सुरु आहेच.
अभिषेक वर्मा (वय 18 वर्ष), परमानंद नागभिडे (वय 26 वर्ष), धर्मराज बावनकर (वय 28 वर्ष) अशी तीन जखमींची नावं आहेत. यापैकी परमानंद आणि धर्मराज यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारांसाठी नागपूरला रवाना केलं आहे. तर अभिषेक वर्मा याच्यावर गोंदियामध्येच उपचार सुरु आहेत.
याप्रकरणात दोन्ही गटांतील सात जणांवर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सात पैकी तीन विधीसंघर्षित बालके आहेत. त्यातील एक श्रीनगर, दुसरा पैकनटोली तर तिसरा भीमनगरातील आहे.
इतर बातम्या