एक्स्प्लोर

धक्कादायक! 2 पोत्यांमध्ये आढळले शरीराचे तुकडे; फायनान्स कंपनीतील वसुलीदाराचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत, गोंदिया हादरले

घटनेची गंभीरता लक्षात घेता सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gondia Crime: गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील दशरथटोला (बाह्मणी) परिसरात पोत्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती सालेकसा पोलिसांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली असून शुभम वाहने (26) रा. दैतबर्रा जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश असे मृतकाचे नाव आहे. (Crime News) सालेकसा तालुक्यातील दशरथटोला येथे 2 वेगवेगळ्या पोत्यांमध्ये शरीरापासून डोकं वेगळा असलेला एक मानवी अवशेष आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नेमकं घडलं काय?

शुभम वाहने हा स्पंदना मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये लोन किस्त वसुलीचे काम करत होता. 4 सप्टेंबर रोजी तो सालेकसा येथे वसुलीसाठी आला होता. मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला. या संदर्भात कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु 21 सप्टेंबर रोजी दशरथटोला परिसरातील शेतात दोन पोत्यांमध्ये कुजलेल्या अवस्थेत मानवी अवयव आढळले. एका पोत्यात धड तर दुसऱ्यात डोक्यासह इतर अवयव आढळले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला ओळख पटवणे अवघड होते. परंतु पोलिसांनी तपास करून हा मृतदेह शुभम वाहने याचाच असल्याचे निश्चित केले. पोलिसांनी मृतकाच्या कुटुंबीयांना संपर्क साधून माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेता सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन पोत्यांमध्ये वेगळे केलेले शरीराचे भाग

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, मृतकाच्या मृत्यूमागील कारणे, त्याचा संबंध कामाशी आहे का, याचा तपास सुरू आहे. शुभम हा लोन वसुलीचे काम करत असल्याने त्याचा कुणाशी वाद झाला होता का, हेही तपासले जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन पोत्यांमध्ये वेगळे केलेले शरीराचे भाग आढळल्याने हा पूर्वनियोजित खून असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

शुभम वाहने हा तरुण मध्यप्रदेशातील असून, कामानिमित्त गोंदियात वारंवार येत असे. 4 सप्टेंबरपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असताना त्याचा असा भयानक मृत्यू झाल्याने कुटुंबीय शोकाकुल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीमान केला असून लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा 

Ahilyanagar Crime : आपल्यात जे झाले ते विसरून जा, तुला जे करायचे ते कर; लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाकडून महिलेवर अत्याचार, अहिल्यानगर हादरलं!

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agarwal Siya Goyal Lohagad Case Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरण; सिया अन् चेतनची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, कोर्टात नेमकं काय काय घडलं?
केतन अग्रवाल हत्या प्रकरण; सिया अन् चेतनची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, कोर्टात नेमकं काय काय घडलं?
Akola : अखेर 'त्या' लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात छापमारे, ACB हाती लागलं मोठं घबाड  
Akola : अखेर 'त्या' लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात छापमारे, ACB हाती लागलं मोठं घबाड  
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
EPFO :  ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद
मोठी अपडेट, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे, सक्रिय करण्याची सुविधा EPFO च्या वेबसाईटवरुन बंद
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
Embed widget