एक्स्प्लोर

मुंबईत सोन साखळी आणि मोबाइल स्नॅचिंग लोकांच्या जीवावर बेततेय!

मुंबईत सोन साखळी आणि मोबाइल स्नॅचिंग लोकांच्या जीवावर बेतत असल्याचे समोर आले आहे. यामुळे या घटनांना रोखणे पोलीस प्रशासनासमोर आव्हान बनले आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन साखळी चोरी आणि मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. या घटना फक्त चोरी पूरत्या मर्यादित नसून यामुळे नागरिकांना गंभीर दुखापतही होत आहे तर काही प्रकरणांमध्ये जीवही गमवावा लागलेला आहे. काही दिवसांपूर्वीच रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीचा फोन हिसकावल्याने तिचा तोल गेल्याने पडून मृत्यू झाला. या घटनेवरुन याचे गांभीर्य समजते. 

एका रात्री साडेसात ते आठ दरम्यानची वेळ. दोन मैत्रिणी विवियाना मॉलमध्ये काम करून आपल्या घरी निघाल्या होत्या. आज कामावरचा त्यांचा हा दुसराच दिवस होता. त्यापैकी एक होती कनमिला रायसिंग. त्यांची रिक्षा तीन महामार्गावर तीन हात नाका उड्डाणपुलाच्या जवळ असतानाच कनमिला यांना फोन आला. त्या फोनवर बोलत असतानाच अचानक बाहेरून दुचाकीवर आलेल्या 2 चोरांपैकी एकाने कनमिला यांच्या हातातला मोबाईल हिसकावला. अचानक झालेल्या या हल्ल्याने त्या घाबरल्या आणि मोबाईल पुन्हा घेण्यासाठी बाहेर झुकल्या. अश्यात त्यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या. यात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. कनमिला विवियना मॉलमध्ये काम करत होत्या. त्यांचा कामाचा दुसराच दिवस होता. मात्र नशिबाने त्यांना साथ दिली नाही. केवळ 10 हजारांच्या मोबाईलमुळे त्यांना जीव गमवावा लागला. ज्यांनी हे कृत्य केले त्या चोरांना मागे काय घडले याची कल्पना देखील नव्हती.

चैन स्नॅचिंग आणि चोरी झालेली आकडेवारी

1 मे 2021 ते 21 मे 2021 

  • चैन स्नॅचिंग सहित चोरी - 55 गुन्हे दाखल झाल यापैकी 48 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश.
  • 1 जानेवारी 2021 ते 21 मे 2021 
  • 300 गुन्हे दाखल झाले ज्यापैका 265 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले 
  • 1 जानेवारी 2020 ते 31 मे 2021
  • 247 गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी 206 गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले.

ठाण्याच पुन्हा एकदा मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशनजवळ एका मोबाईल चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत एका महिलेचा लोकलखाली पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना याच घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती घडली आहे. पण यावेळी ही घटना रस्त्यावर घडली. एक महिला रिक्षाने प्रवास करत असताना अचानक दोन बाईकस्वार येतात. बाईकवर मागे बसलेला महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. पण महिला तो मोबाईल पकडण्याचा प्रयत्न करते. या झटापटीत महिला ही चालत्या रिक्षातून खाली पडते. त्यातच तिचा मृत्यू होतो.

फक्त चैन स्नॅचिंग झालेलं आकडेवारी

मे 2021 

  • या महिन्यात 6 चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेत ज्यापैकी 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश.
  • 1 जानेवारी 2021 ते 31 मे 2021 
  • 48 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 30 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश.
  • 1 जानेवारी 2020 ते 31 मे 2020 

44 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 34 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलय. त्यामुळे तुमची जर एखादी वस्तू एखादा चोरटा चोरत असेल तर आपला जीव धोक्यात घालू नका कारण तुमची वस्तू तर परत मिळेल. मात्र, तुमचा जीव पुन्हा मिळणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
धक्कादायक! प्रेमसंबंधातून तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, तब्बल 52 दिवसानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
धक्कादायक! प्रेमसंबंधातून तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, तब्बल 52 दिवसानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
Pune Payal Zhambre Case : पायल झांबरे प्रकरणी मोठी अपडेट; पती अक्षय झांबरे पोलिसांच्या ताब्यात, माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप
पायल झांबरे प्रकरणी मोठी अपडेट; पती अक्षय झांबरे पोलिसांच्या ताब्यात, माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget