एक्स्प्लोर

मुंबईत अंधेरी पूर्वेत दीड लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी BMC च्या चार क्लीन-अप मार्शलला बेड्या

मुंबईत अंधेरी पूर्वेत दीड लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेच्या चार क्लीन-अप मार्शलला अटक केली आहे.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या वतीने 31 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने क्लीन-अप मार्शलची नेमणूक मुंबई प्रभागांमध्ये करण्यात आली आहे.  मात्र, कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या स्वरूपात पैशांचे मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. 

अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरामधील कंपन्यांमध्ये अश्याच एका मालकाकडून या क्लीन अप मार्शलने मास्क न घातल्यामुळे व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ज्यात कंपनी मालकाने 21 एप्रिल रोजी दीड लाख ऐवजी 20 हजार रुपयांची खंडणी दिली होती. मात्र, या आरोपीने काल संध्याकाळी पुन्हा त्याच कंपनीमध्ये रेड मारून 1 लाखांची खंडणी मागितली. यानंतर कंपनी मालकाने या क्लीनअप मार्शलच्या विरोधात तक्रार करून सर्व प्रकारची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. 

कंपनी मालकाच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी 5 क्लीन-अप मार्शलच्या विरोधात गुन्हा नोंद करुन यातील चार क्लीन-अप मार्शलला अटक केली आहे. प्रमोद माने, विशाल सूर्यवंशी, दादासाहेब गोडसे, आकाश गायकवाड अशी एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या क्लीनअप मार्शलची नावं आहेत. यातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे . या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच यांनी आणखी कोणत्याही ठिकाणी अश्या प्रकारे लूट केली आहे का? याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे, असे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Phoenix Mall Mumbai News: साताऱ्याचा मुलगा, नवी मुंबईची मुलगी, मराठी तरुणाईला कुर्ल्यात मारहाण, मुंबई पोलिसांनो, हुल्लडबाजांची मस्ती उतरवा!
साताऱ्याचा मुलगा, नवी मुंबईची मुलगी, मराठी तरुणाईला कुर्ल्यात मारहाण, मुंबई पोलिसांनो, हुल्लडबाजांची मस्ती उतरवा!
Akola Crime News: अकोल्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेत एका तरुणाचा नरबळी; विकी शिंदेला अटक, लिंबू हवेत उचलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल
अकोल्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेत एका तरुणाचा नरबळी; विकी शिंदेला अटक, लिंबू हवेत उचलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल
Pune Crime News: पतीच्या मृत्यूनंतर पैशांवरून कौटुंबिक वादानं टोक गाठलं, दिर अन् सासूनं शिक्षिकेला संपवलं; वाढदिवसादिवशीच लेक झाली पोरकी; घटनेनं पुरंदर हादरलं!
पतीच्या मृत्यूनंतर पैशांवरून कौटुंबिक वादानं टोक गाठलं, दिर अन् सासूनं शिक्षिकेला संपवलं; वाढदिवसादिवशीच लेक झाली पोरकी; घटनेनं पुण्यातील पुरंदर हादरलं!
Adulteration In Gold Marathi News: सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती
सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Sanjay Raut: डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Embed widget