एक्स्प्लोर

मैत्रिणीची रेकी मित्रांचा डाका.. सांगलीत वृद्ध महिला डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना अटक

सांगली शहरातील वृद्ध महिला डॉक्टरच्या घरावर दरोडा (robbing) टाकणाऱ्या पाच जणांना अटक पोलिसांनी अटक केली आहे.

सांगली : सांगलीत मैत्रिणीच्या सांगण्यावरून एका मित्राने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने वयोवृद्ध डॉक्टर महिलेच्या घरात दरोडा टाकला होता. 5 सप्टेंबर रोजी ही चोरीची घटना घडली होती. घरात घुसून वृद्ध डॉक्टर महिलेच्या गळ्याला चाकू लावून हा धाडसी दरोडा टाकला होता. याप्रकरणी    विश्रामबाग पोलिसांनी आता पाच जणांना अटक केली आहे. यात एका महिलेचाही सहभाग आहे. या पाच जणांकडून एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

ज्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून ही चोरी करण्यात आली. त्या घरात ती मैत्रीण आपल्या एका मित्रासोबत आजाराचे कारण करून गेली होती. त्यावेळी त्या वृद्ध महिला डॉक्टरने आपण आता रुग्ण तपासात नाही असे सांगून त्यांना परत पाठवले. पण याच वेळी त्यांनी घरात कोण कोण राहते याची रेकी केली आणि दरोडा टाकण्याचा प्लॅन ठरवला. या दरोड्याच्या कारवाईत पोलिसांनी चोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेले 5 मोबाईल, 4 दुचाकी वाहने आणि एक कोयता असा एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सांगलीतील विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरात घुसून चाकू गळ्याला लावू दरोडा टाकल्याची घटना सात दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अटकेतील पाच जणांकडून 5 लाख 97 हजारांचे दागिने, 37 हजारांचा मोबाईल, 8 हजार रुपये रोख असा एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमित चंद्रकांत पाचोरे, सचिन शिवाजी फोंडे, रोहित देवगोंडा पाटील, निखिल राजाराम पाटील आणि पायल युवराज पाटील अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत. पायल आणि तिचा मित्र निखील यांनीच कट रचून दरोड्याचा गुन्हा घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. 

5 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डॉ. नलिनी नाडकर्णी घरामध्ये एकट्या असताना तिघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. डॉ. नलिनी यांच्या गळ्याला धारदार कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत 25 तोळे सोने आणि रोख रक्कम लुटली होती. गुन्हा घडलेल्या ठिकाणी कोणताही पुरावा मिळू नये यासाठी आरोपींनी सर्व पुरावे नष्ट केले होते. त्यामुळे या प्रकरणी तपास करणे पोलिसांपुढे आव्हान होते. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील हे तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की, नलिनी नाडकर्णी यांच्यकडे पायल ही आपल्या मित्रांसोबत आजाराचे कारण करून गेली होती. त्याचवेळी घराची रेकी करत पायल पाटील हिने तिचा मित्र निखील पाटील याच्यासोबत कट रचून घरात दरोडा टाकण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी पाचोरे, फोंडे आणि रोहित पाटील यांची मदत घेतली. त्यावरून नांद्रे, वसगडे, खटाव आणि सांगली येथे छापा टाकून पाच जणांना अटक केली. पाच जणांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सर्वांनी मैत्रिणीच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली. या पाचही जणांकडून पोलिसांनी चोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेले 5 मोबाईल, 4 मोटारसायकली आणि एक कोयता असा एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget