Mumbai Sion Koliwada Firing : मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली असून त्यामध्ये एकजण जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपी आणि पीडित व्यक्तीमध्ये पैशाच्या व्यवहारावरून भांडण सुरू होते,  त्यानंतर आरोपीने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. अक्षय कदम उर्फ ​​स्वामी असे पीडित तरुणाचे नाव असून त्याचे वय अंदाजे 34 वर्षे असल्याचे सूत्रांनी सांगितले.अक्षयवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास आरोपी आपल्या काही मित्रांसह टॅक्सीमध्ये आला आणि त्याने पीडित व्यक्तीला दार ठोठावून झोपेतून उठवले. पीडितेने दरवाजा उघडताच आरोपीने त्याच्यावर गोळीबार केला.


या संदर्भात अँटॉप हिल पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही स्वतंत्र पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.


ही बातमी वाचा: