Saurabh Tripathi : मुंबई गुन्हा शाखेच्या सीआययू युनिटद्वारा निलंबित आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) यांचे वडील नीलकंठ हे वसुली प्रकरणात आरोपी ठरले आहेत. सध्या पोलीस सौरभ त्रिपाठी यांच्या शोध घेत आहेत. क्राईम ब्रँचने सौरभ त्रिपाठी यांचे नातेवाईक आशुतोष मिश्रा यांना यूपीच्या बस्ती जिल्ह्यातून अटक करून काल (8 एप्रिल) मुंबईतील फोर्ट कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांला 11 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. 


क्राइम ब्रँचने सांगितले की, आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांनी अंगडिया व्यापाऱ्यांकडून 40 लाख वसूल केले.  30 नोव्हेंबर रोजी अटक केलेले पोलीस अधिकारी ओम वनगाटे यांनी त्रिपाठी यांचा नोकर प्यारेलाल गौर यांना 35 लाख रुपये पाठवले आणि उर्वरित पाच लाख अटक आरोपी आशुतोष मिश्रा आणि त्रिपाठी यांचे वडील नीलकंठ यांना पाठवले. पोलीस आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या शोध घेत आहेत. आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी हे सध्या अटकेत असलेल्या आशुतोष मिश्रा यांच्या आणि वडील नीलकंठ यांच्या संपर्कात आहेत.


कोण आहेत सौरभ त्रिपाठी? 
त्रिपाठी, हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी असून एमबीबीएस आणि एमडी (त्वचाविज्ञान) पदवीधर असून त्यांनी मुंबईतील नायर रुग्णालयात शिक्षण घेतले आहे. यापूर्वी त्यांनी डीसीपी झोन 4, वाहतूक पोलिसात डीसीपी, डीसीपी एसबी (1) म्हणून पदभार सांभाळला आहे, त्यापूर्वी अहमदनगरचे एसपी देखील होते. याप्रकरणानंतर त्यांची डीसीपी झोनमधून डीसीपी ऑपरेशन्स या पदावर बदली करण्यात आली होती परंतु फरार असल्यामुळे त्यांनी हा पदभार स्वीकारला नाही.


महत्वाच्या बातम्या