गाडीची काच फुटून गोळी चालक बाजूच्या सीटमध्ये घुसल्याने वेताळ हे थोडक्यात बचावले होते. भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पलूस मधील प्रसिद्ध उद्योजक असलेलले वेताळ यांच्यावर गुरुवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोरांनी पलूस रस्त्यावर घराशेजारी मोटारीवर गोळीबार केला होता. काच फुटून गोळी चालक बाजूच्या सीटमध्ये घुसली. वेताळ हे थोडक्यात बचावले. भरदुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले, पलुस पोलिस स्टेशनचे स. पो.नि. विकास जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये सांगली एलसीबी, स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.
Sangli Crime | पलूसमध्ये उद्योजक प्रदीप वेताळ यांच्या कारवर अज्ञातांचा गोळीबार | ABP majha
यामध्ये सुरज सुधाकर चव्हाण रा.डफळापूर या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कामात एलसीबीच्या पीएसआय प्रविण शिंदे, सागर लवटे, संदीप गुरव, बिरू नरळे, निलेश कदम यांनी धडाकेबाज कामगिरी बजावत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले. आरोपी चव्हाण हा 2017 मध्ये मध्ये वेताळ यांच्या फौड्रीमध्ये काम करत होता. यावेळी त्यांच्या मध्ये पैशाचा वाद झाला होता. या पैसे घेणे देणे च्या वादातून कामगारानेच गोळी झाडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात त्याने वापरलेल्या मोटारसायकल तसेच गोळीबारातील कंट्रीमेड पिस्तूल बाबत तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या :
अर्नाळ्यात पकडलेल्या बांगलादेशींकडे जन्माचा दाखला
पुण्यात शेजारणीकडे घराची चावी ठेवणं महागात; बनावट चावीद्वारे लाखो रुपयांवर डल्ला