आरोपी आणि फिर्यादी या एकाच सोसायटीत जवळजवळ राहतात. फिर्यादी जेव्हा बाहेर जायच्या तेव्हा त्या भारती असवानी यांच्याकडे घराची चावी ठेवून जायच्या. दरम्यान भारती असवानी यांनी बनावट चावी तयार केली आणि जेव्हा शहा कुटुंबीय बाहेर गावी जायचे तेव्हा दोन्ही आरोपी महिला बनावट चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश करून चोरी करत असत. हा प्रकार जून 2018 ते फेब्रुवारी 2020 या काळात सातत्याने घडत होता. या कालावधीत फिर्यादी यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सात लाख 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेला होता.
चोरी केल्यानंतर प्रेयसीला पाठवायचा सेल्फी; अजब प्रेमवीराला फिल्मी स्टाईलने अटक
कुलूप न उघडताही चोरी होत असल्याने कुटुंबीय हैराण -
घराचे कुलूप न उघडताही चोरी होत असल्याने शहा कुटुंबीय हैराण होते. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्यांनी बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला आणि त्याचा अक्सेस मोबाईलवर घेतला. त्यानंतर शेजारिच राहणाऱ्या भारती असवानी यांना मुंबईला जात असून घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. परंतु, मुंबईला न जाता ते जवळच असणाऱ्या फ्लॅट राहण्यास गेले. इकडे ते जाताच आरोपी महिलांनी बनावट चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला आणि बेडरुममधील कपाट उघडून शोधाशोध सुरू केली. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि फिर्यादीच्या मोबाईलमध्ये दिसून आले. त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ घरी धाव घेत आपल्या शेजाऱ्यांना घरात चोरी करताना रंगेहाथ पकडले आणि याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत दोघी आरोपींना अटक केली.
Pimpri Robbery | पिंपरी-चिंचवडमध्ये दुकानात चोरी, शटर तोडून चोरांचा दानपेटीवर डल्ला, तीन सेकंदात उघडलं शटर