12 फेब्रुवारी रोजी विरारच्या अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीत 23 बांगलादेशींना अवैद्य वास्तवप्रकरणी अटक केली होती. पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक पथकाने ही कारवाई केली होती. या अटक 23 बांगलादेशी पैकी 2 बांगलादेशी नागरिकांचा जन्माचा दाखला अर्नाळा ग्रामपंचायतीचा असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. परविना अकरा गाजी, रफीकुल मेसार गाजी या दोन अटक बांगलादेशीयांचे अर्नाळा ग्रामपंचायतने दिलेले दाखले आहेत.
Bangladeshi immigrants | दोन हजारात बांगलादेशी 'भारतीय' होतो; मुंबई, ठाण्यात घुसखोरांचे अड्डे | स्पेशल रिपोर्ट
या दाखल्यातील परविना यांची जन्म तारीख 7 ऑगस्ट 1975 अशी आहे आणि यांना 16 जानेवारी 2008 ला जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तर याची नोंदणी 15 ऑगस्ट 1975 ला करण्यात आली असून नोंदणी क्रमांक 01 आहे. तर राफीकुल यांचा जन्म 20 जून 1973 असून 25 ऑगस्ट 1973 लाच याची नोंदणी करण्यात आली आहे. याचा नोंदणी क्रमांक 11 आहे. 29 जानेवारी 2007 ला जन्म प्रमाणपत्र अर्नाळा ग्रामपंचायतने दिले आहे.
आता या प्रकरणात पोलीसांनी अर्नाळा ग्रामपंचायतीकडून जन्म प्रमाणपत्र मिळाल्याचा खुलासा मागितला आहे. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यान्वये असे नोंदणी पत्र आले तर त्याची नोंदणी करावी लागते. पण त्या काळात कोणत्या आधारावर नोंदणी केली, हे आम्ही पाहत आहोत. पण 2007-2008 चे रेकॉर्ड खराब झाल्याने ते मिळेलच का नाही याची शाश्वती मात्र ग्रामसेवक देत नाहीत. याबाबत अर्नाळा सागरी पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
संबंधित बातम्या :
मनसेने पकडून दिलेले 'ते' कथित बांगलादेशी राज ठाकरेंवर खटला दाखल करणार
भारताने घुसखोर बांगलादेशींची यादी द्यावी, आम्ही त्यांना मायदेशी बोलावू : बांगलादेश